Randeep Hooda blessed with a baby girl : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. अभिनेता आता वडील झाला आहे. त्याची पत्नी लिन लैश्राम यांनी एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. वडील झाल्यानंतर अभिनेत्याला खूप आनंद झाला असून त्याने सोशल मीडियावर नवजात बाळाची झलकही दाखवली आहे. विशेष म्हणजे रणदीपच्या मुलीचा जन्म त्याच दिवशी झाला, ज्या दिवशी त्याचे वडील रणबीर यांचाही वाढदिवस आहे. चित्रात आजोबा म्हणजेच रणदीपचे वडील आपल्या नातवाला आपल्या मांडीवर घेऊन आनंदात असल्याचं दिसत आहे.
रणदीपने असेही सांगितले की, मुलगी आणि पत्नी लिन लैश्राम बऱ्या आणि निरोगी आहेत. एका छायाचित्रात रणदीपने आपल्या मुलीचा चेहरा दाखवला आहे. ती तिच्या आजोबांच्या मांडीवर आहे आणि दुसऱ्या चित्रात अभिनेत्याने मुलीचा हात दाखवला आहे. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या चाहत्यांसह वडील बनण्याची आनंदाची बातमी शेअर केली आणि लिहिले, “आजोबा आणि नातवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज जेव्हा मी वडील झालो आहे, तेव्हा तुमच्याबद्दलची माझी कृतज्ञता अधिकच वाढली आहे, पप्पा”. रणदीपने पुढे लिहिले, “आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे – लिन, मला वडील बनवल्याबद्दल आणि आमच्या लहान मुलीला या जगात आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक लहान मुलगी आणि आयुष्यभराचे प्रेम”.
आणखी वाचा – कडकडून मिठी, डोळ्यांत पाणी आणि…; अखेर विशाखा सुभेदार यांचा लेक मायदेशी परतला, एअरपोर्टवर…
रणदीप हुडाने ही आनंदाची बातमी शेअर करताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी या जोडप्याचे अभिनंदन केले आणि नवजात मुलीवर खूप प्रेम केले. फैसल मलिक, प्रिया मलिक आणि फ्रेडी दारूवाला यांच्यासह अनेक चित्रपट कलाकारांनी रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांचे पालक बनल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
आणखी वाचा – लेकाला ट्युमर, मोठी शस्त्रक्रिया आणि…; जॉनी लिव्हरच्या लेकाची होती वाईट अवस्था, लेकीने केला खुलासा
रणदीप आणि लिन लैश्राम यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये केली गर्भधारणेची घोषणा
रणदीप हुडा आणि लिन लैश्राम यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली. तेव्हा या जोडप्याच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. रणदीप आणि लिनने जंगलात शेकोटीजवळ बसलेले स्वतःचे काही फोटो शेअर केले होते, ज्यावर लिहिले होते- दोन वर्षांचे प्रेम, रोमांच आणि आता थोडे साहस येत आहे. आता नुकतेच या जोडप्याने मॅटर्निटी फोटोशूट केले, ज्याचे खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले आहेत. रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम यांचे २०२३ साली लग्न झाले. मणिपूरमधील इंफाळ येथे पारंपरिक मेईतेई रितीरिवाजांनुसार त्यांचे लग्न झाले. साधेपणा आणि सांस्कृतिक रितीरिवाजांमुळे त्यांचे लग्न चर्चेत होते.





