Prateik Babbar Wedding : दिग्गज अभिनेता राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत राहतो. दरम्यान, अलीकडेच प्रतीक बब्बरने आज व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जी यांच्याशी लग्न केले. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खरे पाहता प्रतीक बब्बरने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्याने त्याच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह दिली आहे. ज्यामध्ये तो त्याची गर्लफ्रेंड प्रियाबरोबर लग्नविधी पार पडताना दिसला. त्याच वेळी, मंडपाच्या एका फोटोत, प्रतीक खूप भावुक झालेला दिसला यावेळी त्याची पत्नी प्रिया त्याला सांभाळताना दिसली.
तसेच प्रतीक व प्रिया यांच्या लग्नातील आणखी एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात लग्नानंतर प्रतीकने बायकोबरोबर लिपलॉक करुन तिच्यावर खूप प्रेम लुटले आहे. आता या दोघांच्या फोटोंवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.लग्नासाठी प्रतीक व प्रिया यांचा खास लूक पाहायला मिळाला. इतकंच नव्हे तर यावेळी त्यांनी मॅचिंग कपडे परिधान केले होते. यावेळी प्रतीक पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. तर प्रियानेही सारख्याच रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
आणखी वाचा – लगीनघाईत अंकिता वालावलकरच्या गाडीचा अपघात, मोठं नुकसान पण दोघेही सुखरूप, व्हिडीओद्वारे दाखवली झलक
लग्नानंतर प्रतीक आणि प्रिया यांनीही पापाराजी यांची भेट घेतली आणि या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या मिठाईही पापाराजींना वाटल्या. यावेळी, या दोघांच्या तोंडावर लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसून आला. २०२३ मध्ये, प्रतीक बब्बर आणि प्रिया यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला आणि यानंतर आता ही जोडी लग्नबंधनात अडकली. यापूर्वी, प्रतीकचे लग्न सान्या सागरशी झाले होते, परंतु ४ वर्षानंतर त्यांचे हे नाते संपले. त्याच्या पहिल्या पत्नीपासून काही महिन्यांच्या घटस्फोटानंतरच तो प्रियाशी रिलेशनशिपमध्ये आला.
प्रतीक बब्बरच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आपल्या चित्रपटाची कारकीर्द ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाने सुरु केली. यानंतर, अभिनेत्याने ‘धोबी घाट’, ‘डम मारोन डम’, ‘आरक्षण’, ‘बागी 2’, ‘मुल्क’ आणि ‘द पॉवर’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये चांगली कामगिरी केली. या व्यतिरिक्त, प्रतीकने टेलिव्हिजन मालिकेत त्यांच्या अभिनयाने खास अशी ओळख निर्माण केली.