सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा; हेमा मालिनी आणि लेक इशा पोहोचली रुग्णालयात, ब्रीच कँडीबाहेरची सिक्युरिटी वाढवली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 11, 2025 | 12:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
dharmendra health updates

धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा; हेमा मालिनी आणि लेक इशा पोहोचली रुग्णालयात, ब्रीच कँडीबाहेरची सिक्युरिटी वाढवली

dharmendra health updates : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आज सकाळपासून त्यांच्या निधनाच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. मात्र, त्यांच्या निधनाच्या या अफवांवर कुटुंबीयांनी पोस्ट शेअर करत भाष्य केलं. या अफवा खोट्या ठरवत धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओलने पोस्ट शेअर केली. दोघीनींही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं स्पष्ट केलं आणि खोट्या अफवा पसरवू नका अशी विनंती केली. तसेच कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करा अशी विनंतीही केली. तर हेमा मालिनी यांनी पतीच्या निधनाची पोस्ट पाहताच राग व्यक्त केला.

यानंतर आता हेमा मालिनी आणि ईशा देओल ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचल्या आहेत. वरिंद्र चावलाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दोघीही एकाच गाडीतून हॉस्पिटलमध्ये गेल्याच पाहायला मिळत आहे. यादरम्यान, हॉस्पिटल बाहेरची सुरक्षा अधिक केली असल्याचं चित्र दिसतंय. धर्मेंद्र यांची भेट घेण्यासाठी पत्नी आणि लेक हॉस्पिटलमध्ये पोहोचली असल्याचं दिसतंय, त्यामुळे अर्थात त्यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट होतंय.

आणखी वाचा – ९ सेमी ट्यूमर आणि किडनी स्टोन; दीपिका कक्करवर उपचार सुरु, २२% यकृताचा भागही काढला, डॉक्टरांनाही बसला धक्का

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

गेले १२ दिवस धर्मेंद्र मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र गेल्या २ दिवसांत त्यांची प्रकृती अधिक खालावली. काल त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता तेव्हा त्यांना व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आले. सोमवारी रात्री (१० नोव्हेंबर) देओल कुटुंबीयांसह सलमान खान, शाहरुख खान, आर्यन खान, अमीषा पटेल, गोविंदा हे सेलिब्रिटी सुद्धा ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी अभिनेत्री अमीषा पटेलला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

आणखी वाचा – धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त खोटं, लेक इशा देओल आणि पत्नी हेमा मालिनीने दिली माहिती, वाचा सविस्तर

सध्या देओल कुटुंबीयांनी प्रायव्हसीचा आदर करून खोट्या बातम्या पसरवू नका अशी विनंती सर्वांना केली आहे. “जे घडत आहे ते अक्षम्य आहे. जबाबदार चॅनेल्स उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि हळूहळू बरे होणाऱ्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार वर्तन आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा आदर करा”, असं हेमा मालिनी यांनी पोस्ट करत संताप व्यक्त केला.

Tags: bollywood newsdharmendrahema malini
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
film asambhav Trailer

रहस्य आणि थरार उलगडणारा ‘असंभव’, चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता, २१ नोव्हेंबरपासून प्रदर्शित

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.