सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त खोटं, लेक इशा देओल आणि पत्नी हेमा मालिनीने दिली माहिती, वाचा सविस्तर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 11, 2025 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
dharmendra health update

धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त खोटं, लेक इशा देओल आणि पत्नी हेमा मालिनीने दिली माहिती, वाचा सविस्तर

dharmendra health update : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वृत्तानं चाहत्यांमध्ये गोंधळाचं वातावरण पसरलं आहे. त्यांच्या निधनाची बातमी खरी आहे की खोटी याने साऱ्यांना संभ्रमात पाडलं आहे. माध्यमांमध्ये त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली. मात्र धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचं जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती. मागील १२ दिवस ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती अधिक खालावली. यादरम्यान, त्यांची भेट घेण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकाकारांनी रुग्णालय गाठले.

यादरम्यान, आज दिनांक ११ नोव्हेंबरला उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र, धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल यांनी मात्र निधनाचं वृत्त फेटाळलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती आहे.

आणखी वाचा – ९ सेमी ट्यूमर आणि किडनी स्टोन; दीपिका कक्करवर उपचार सुरु, २२% यकृताचा भागही काढला, डॉक्टरांनाही बसला धक्का

What is happening is unforgivable! How can responsible channels spread false news about a person who is responding to treatment and is recovering? This is being extremely disrespectful and irresponsible. Please give due respect to the family and its need for privacy.

— Hema Malini (@dreamgirlhema) November 11, 2025

“माझे वडील धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर आहे. आम्ही विनंती करतो की, आमच्या या कठीण काळात आम्हाला प्रायव्हसी द्याल. तुमच्या प्रार्थनांसाठी आभार”, अशी पोस्ट ईशा देओलनं शेअर केली आहे. धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत त्यांचे चाहते इशा देओलच्या पोस्टवर कमेंट करत विचारपूस करत आहेत. चित्रपट अभिनेते तथा माजी खासदार धर्मेंद्र यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमधून भूमिका साकारल्या. चित्रपट रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजविले. पंजाबमधील एका छोट्या गावातून मुंबईत येऊन त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Tags: bollywood actordharmendraentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
dharmendra health updates

धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा; हेमा मालिनी आणि लेक इशा पोहोचली रुग्णालयात, ब्रीच कँडीबाहेरची सिक्युरिटी वाढवली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.