अभिनेत्री यामी गौतम ही बॉलिवूडमधील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभियनाबरोबरच यामीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. यामी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत यामी चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच यामीबद्दल एक आनंदाची बातमी समजत आहे. काही दिवसांपूर्वी यामी व आदित्य धर यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे कळले होते आणि अभिनेत्री अखेर आई झाली आहे.
यामीने मुलाला जन्म दिला आहे. यामी व तिचा पती आदित्य यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यांनी एक खास पोस्ट शेअर करत त्यांच्या चिमूकल्याबद्दलची गुडन्यूज शेअर केली आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या मुलांचे नावही जाहीर केले आहे. पोस्ट करून डॉक्टर आणि मीडियाचे आभार मानले आहेत. यासोबतच या जोडप्याने सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘वेदविद’ ठेवले आहे. त्यांच्या मुलाचा जन्म अक्षय्य तृतीयेला झाला.
आणखी वाचा – मेष, वृषभ, कर्क राशीसह ‘या’ राशींसाठी सोमवार आर्थिक लाभाचा दिवस, तुमच्या नाशिबात नेमकं काय?, जाणून घ्या…
या पोस्टमध्ये त्यांनी सर्वांचे आभार मानत असं म्हटलं आहे की, “आम्ही पालकत्वाच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करत असताना, आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची आतुरतेने अपेक्षा करत आहोत. त्याने गाठलेल्या प्रत्येक मैलाच्या दगडासह, तो आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी तसेच आपल्या प्रिय राष्ट्रासाठी अभिमानाचा दीपस्तंभ बनेल या आशेने आणि विश्वासाने आम्ही भरलेले आहोत.”
आणखी वाचा – Video : साताऱ्यात ‘पारू’चं शूट करत असताना बायकोच्या आठवणीत प्रसाद जवादे व्याकुळ, अमृता म्हणाली, “तू माझा…”
यामीने शेअर केलेल्या या पोस्टखाली मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिच्या अनेक चाहत्यांनीही कमेंट्सद्वारे अभिनंदन असं म्हटलं आहे. दरम्यान, यामी गौतम आणि आदित्य धर यांचा विवाह ४ जून २०२१ रोजी झाला होता. दोघांनी २ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि लग्नाच्या तीन वर्षांनी या जोडप्याने एका चिमूकल्याला जन्मही दिला आहे.