गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ओठ-चेहरा सुजला, वजन घटलं आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची वाईट अवस्था, घटस्फोटानंतरची परिस्थिती…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 26, 2025 | 11:32 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Urmila Matondkar face change

ओठ-चेहरा सुजला, वजन घटलं आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची वाईट अवस्था, घटस्फोटानंतरची परिस्थिती…

Urmila Matondkar face change : उर्मिला मातोंडकरने ९०च्या दशकात आणि २०००च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये स्वतःच्या जीवावर आपले स्थान बनविले. तिच्या सुंदर दिसण्याने ‘सेक्सी’ अभिनेत्री म्हणून तिला सिनेविश्वात ओळखले जात असे. वयाच्या ५१ व्या वर्षी अभिनेत्री चंदेरी पडद्यापासून दूर असलेली पाहायला मिळत आहे. परंतु ती तिच्या ग्लॅमरसतेमुळे नेहमीच राहिलेली दिसली. मात्र अलीकडेच, उर्मिलाला नवीन फोटोंमध्ये ओळखले गेले नाही आणि तिचा लूक पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे की, वजन कमी करण्यासाठी तिने कोणती शस्त्रक्रिया तर अवलंबली नाही ना?.

महत्त्वाचे म्हणजे, उर्मिला मातोंडकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती तिचे हटके फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीच्या समोर आलेल्या एका नव्या फोटोनंतर तिच्यातील बदलांना घेऊन चर्चा सुरु झालेली पाहायला मिळत आहे. नवीन फोटोंमध्ये उर्मिलाने स्कर्ट सेट परिधान केला होता. त्यात स्कर्टसह तिने गुलाबी रंगाचे जॅकेट-स्टाईल टॉप घातले होते. वयाच्या ५१ व्या वर्षीही ती खूप बारीक दिसत होती. मात्र तिच्या चेहऱ्यामध्ये झालेले बदल चाहत्यांनी हेरले आणि यावर अनेक सवाल उपस्थित केले. जाड ओठ, सुजलेला चेहरा पाहून चाहते आश्चर्यचकित झाले.

आणखी वाचा – १५ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर लता सभरवाल यांची पहिली पोस्ट लक्षवेधी, टीका करत म्हणाल्या, “सुंदर चेहरा शोधणे सोपे पण…”

View this post on Instagram

A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial)

उर्मिलाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये कोणतेही कॅप्शन जोडले नाही, त्याऐवजी तिने हार्ट इमोजी शेअर केला. चाहत्यांनी ती कशी ओळखता आली नाही हे सांगितले आणि तिच्या चेहर्यावरील वैशिष्ट्ये देखील वेगळी दिसत असल्याचं म्हटलं. एका नेटकाऱ्याने लिहिले, “तुम्ही चेहऱ्यावर काय केले?”. तर दुसर्‍याने लिहिले, “अभिनेत्रींच्या चेर्याव्र १० जीबी एआय काम केले आहे असं वाटत आहे. कृत्रिम पद्धतीने आणखी एक सौंदर्य गमावले”.

आणखी वाचा – शिक्षणासाठी न्यूयॉर्क गाठलं, एकटाच राहण्याची वेळ आली अन्…; ‘तारक मेहता…’मधील गोली आता जगतोय असं आयुष्य, मालिकेच्या एक्झिटनंतर…

उर्मिला हिने ‘रंगीला’, ‘जुदाई’, ‘सत्या’, ‘छोटा चेतन’, ‘कौन’, ‘खूबसूरत’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘भूत’ आणि अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा शेवटचा हिंदी चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि २०१८ मध्ये तिने ब्लॅकमेल गाण्यांमध्ये सादरीकरण केले. २०२२ मध्ये, ती ‘डीआईडी सुपर मॉम्स’ या नृत्य रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसली. गेल्या वर्षी हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की उर्मिला मातोंडकर यांनी तिचा नवरा मोहसिन अख्तर मीर यांच्याकडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. अभिनेत्रीच्या जवळच्या एका स्रोताने हे उघड केले की उर्मिलाने मोहसिनबरोबर तिचे लग्न संपविण्याचा निर्णय घेतला आहे, जो संपूर्ण देशासाठी एक धक्का आहे. तथापि, त्यांच्या विभक्त होण्यामागील कारण अद्याप माहित नाही.

Tags: actress look trollbollywood actressUrmila matondkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Dilip Joshi real life wife

पत्नी १४ वर्षांची असतानाच साखरपुडा, लग्न अन्...; जेठालालच्या खऱ्या आयुष्यातील दया कोण?, अभिनेत्याची हटके लव्हस्टोरी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.