बॉलिवूडमध्ये सध्या सनी लिओनि हे नाव खूप चर्चेत आहे. २०१२ साली तिने ‘जिस्म २’ या चित्रपटामधून मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटामधून तिला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली. ‘जॅकपॉट’, ‘राघिणी एमएमएस २’, ‘एक पहेली लीला’, ‘वन नाइट स्टँड’ व ‘तेरा इंतजार’ अशा अनेक चित्रपटांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आली. याव्यतिरिक्त तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग देखील केले असून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. सध्या सनी खूपच कमी प्रमाणात पडद्यावर दिसून येते. त्यामुळे ती नक्की कशी कमाई करते? तसेच तिची संपत्ती किती? याबद्दल आपण जाणून घेऊया. (sunny leone luxury life)
चित्रपट, आयटम सॉंग न करता सनी आता रिॲलिटी शोचे सूत्रसंचलन करताना दिसते. सध्या ती एमटीव्ही वाहिनीवरील प्रसिद्ध शो स्प्लिटविलामध्ये डिसीन आहे. तिच्या संपत्तीबद्दल सांगायचे झाले तर, ‘कोईमोई’च्या रिपोर्ट्सनुसार तिची संपत्ती १६ मिलियन डॉलर्स आहे. तसेच ‘सीएनबीसी’च्या रिपोर्ट्सनुसार, सनीचा मुंबईमध्ये एक फ्लॅट असून त्याची किंमत जवळपास १६ कोटी रुपये इतकी आहे. अभिनयाबरोबरच सनी उद्योजिकादेखील आहे. तिचा स्वतःचा कॉस्मेटिक ब्रॅंड व कपड्यांचा ब्रॅंडदेखील आहे. त्याचप्रमाणे तिच्याकडे वेगवेगळ्या ब्रॅंडच्या पाच लक्जरी कार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सनी ‘स्प्लिट्सविला १२’ साठी तब्बल ५ लाख रुपये मानधन घेतले होते.
काही वर्षांपूर्वी सनी महाराष्ट्रातील लातूर येथील अनाथआश्रमातून एका मुलीला दत्तक घेतले होते. त्यावेळी तिचे सर्वच स्तरातून खूप कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर तिला सरोगरसीच्या माध्यमातून दोन मुलंही झाली. ती तिच्या तीनही मुलांचा अतिशय योग्य रीतीने सांभाळ करते. मुलांबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
सनीच्या पूर्व आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर सनी पॉकेटमनी मिळवण्यासाठी बेकरी टेक्स व रिटायरमेंट फर्ममध्ये काम करायची. २०११ साली ती डेनियल वेबरबरोबर लग्नबंधनात अडकली. सध्या ती पतीबरोबर भारतातच स्थायिक झाली आहे.