बॉलिवूड अभिनेत्री रेखा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. रेखाचे आयुष्य हे अगदी संघर्षाने भरलेले आहे. लहानपणापासूनच त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या पाहिल्या आहेत. त्यांनी ज्याच्यावर प्रेम केले ती व्यक्त त्यांना सापडली नाही आणि ज्याच्याशी त्यांनी लग्न केले त्या व्यक्तीनी त्यांची साथ सोडली. तसेच ती तिच्या वडिलांचाही तिरस्कार करत होती. रेखाच्या वडिलांचे नाव जेमिनी गणेशन होते. ते एक प्रसिद्ध अभिनेतेही होते. त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत खूप काम केले आहे. त्यामुळे त्यांचा चाहतावर्गही प्रचंड मोठा होता.
रेखा यांचे वडील त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. रेखा यांचे वडील जेमिनी यांनी वयाच्या १९ व्या वर्षी अलामेलूशी पहिले लग्न केले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली. त्यानंतर रेखाची आई पुष्पावलीबरोबर त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यांना रेखा व राधा अशा दोन मुली झाल्या. जेमिनीने रेखाच्या आईशी कधीही लग्न केले नाही. त्यानंतर जेमिनी यांनी त्यांची सहअभिनेत्री सावित्रीशी लग्न केले. यातून त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. जेमिनीचे तिसरे लग्न ज्युलियाना अँड्र्यूशी झाले होते. मात्र तिला कोणी अपत्य नव्हते.

रेखाच्या वडिलांना अशी एकूण ८ अपत्ये होती. जेमिनी यांनी रेखाच्या आई पुष्पावलीशी लग्न केले नाही. या कारणामुळे ती तिच्या वडिलांचा तिरस्कार करत होती. मात्र, १९९४ मध्ये रेखा यांनी स्वतः वडिलांना जीवनगौरव पुरस्कार दिला. त्यानंतर वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. रेखा यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. रेखा यांची लव्हलाईफ अनेकदा चर्चेत राहिली आहे. बॉलिवूडमध्ये कार्यरत असताना अनेकदा अनेक अभिनेत्यांबरोबर त्यांचे नाव जोडले गेले आहे.
आणखी वाचा – ‘अशी ही बनवाबनवी’चा दूसरा भाग कधीच येणार नाही, सचिन पिळगावकरांचा खुलासा, म्हणाले, “आता लक्ष्या नाही…”
नवीन निश्चल याच्यानंतर जितेंद्रन किरण कुमार आणि नंतर विनोद मेहरा यांच्याशीही त्यांचे नाव जोडले गेले होते. विनोद मेहराबरोबरच्या त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्याही आल्या होत्या. पण रेखा यांनी नेहमीच या सर्व गोष्टींचे खंडन केले. या कलाकारांबरोबरच अमिताभ बच्चन व रेखा यांच्या नात्याबद्दलच्यादेखील अनेक चर्चा रंगल्या होत्या आणि त्या चर्चा आजही रंगताना दिसतात.