अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांचा बुधवारी सकाळी मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. वांद्रे पोलीस अनिल मेहता यांच्या मृत्यूचा तपास करत आहेत. तपासात पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. अनिल मेहता यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट्समध्ये त्यांच्या डोक्याला जखमा झाल्याचं समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कुटुंबीयांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजता वांद्रे येथील अल्मेडा पार्क परिसरात असलेल्या ‘आयशा मनोर’ नावाच्या इमारतीवरून पडून मेहता यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वांद्रे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Malaika Arora Father Anil Mehta Death)
अनिल मेहता मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांचे जबाब नोंदवले आहेत. ज्यामध्ये इमारतीच्या चौकीदाराचेही विधान आहे, ज्याने अनिल मेहता यांना जमिनीवर पडल्यानंतर प्रथम पाहिले. सुरक्षा रक्षकाच्या म्हणण्यानुसार त्याला काहीतरी पडल्याचा आवाज आला. तेव्हा त्याने जाऊन पाहिले असता त्याला अनिल मेहता जमिनीवर पडलेले दिसले. या संदर्भात मलायका अरोराची आई जॉयस यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. तपासादरम्यान मुंबई पोलिसांना एक डायरीही सापडली. जी अनिल मेहता यांची डायरी आहे. अनिल मेहता रोज एक डायरी लिहायचे. मात्र या डायरीत सुसाईड नोट व मृत्यूचे कारण नमूद नाही.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “त्याला सगळं कळतं”, अरबाजने वैभवकडे केली सूरजची चुगली, म्हणाला, “तो साधा माणूस नाही तर…”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डायरीत अनिल मेहता यांचा आहार आणि औषध सेवनाचा उल्लेख आहे. पोलिस अनिल मेहता यांच्या वैद्यकीय इतिहासाचीही चौकशी करत आहेत. या प्रकरणी अनिल मेहता यांच्या डॉक्टरांचा जबाब नोंदवायचा आहे. पोलिस अनिल मेहता यांच्या मोबाईलचीदेखील चौकशी करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या आतापर्यंतच्या माहितीनुसार, अद्याप तपासात अनिल कपूर यांच्या मृत्यूचे कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून नक्की कोण बाहेर जाणार? ‘त्या’ कृतीमुळे आर्या ठरणार का नॉमिनेशनची बळी?
वडिलांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा अभिनेत्री मलायका पुण्यात होती. या दु:खद घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री केवळ ११ वर्षांची होती तेव्हापासून मलायकाचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे राहत होते. मलायकानेही तिच्या आई-वडिलांच्या विभक्त होण्याच्या वेदना शेअर केल्या होत्या. अशातच आता वडिलांच्या निधनामुळे अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.