बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूपच चर्चेत आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पण सध्या ती कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर राजकारणामुळे चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवलयानंतर लगेचच एका घटनेमुळे चर्चेत आली आहे. चंदीगढ एअरपोर्टवर एका CISF कॉन्स्टेबलने कंगनाच्या कानाखाली मारल्यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या प्रकणावर कंगना व महिला कॉन्स्टेबल या दोघींचेही प्रतिक्रिया देतानाचे व्हिडीओ समोर आले. यानंतर माहिला कॉन्स्टेबलला बडतर्फ करण्याची मागणीदेखील करण्यात आली. पण आता कंगनाबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. (Kangana ranuat angry on reporter)
कंगनाने लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपाकडून मिळालेल्या तिकिटावर हिमाचल प्रदेशातील मंडी येथून निवडून आली आहे. आज (७ जून) कंगना संसदभवनात पोहोचली. तेव्हा तिथे तिने माध्यामबरोबर हुज्जत घातली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कंगना संसदभवनात एनडीए संसदेच्या एका बैठकीसाठी पोहोचली होती. यावेळी ती रागात असल्याचे दिसून आले. यावेळी समोर असलेल्या प्रतिनिधीचा माइक बाजूला करतानादेखील दिसत आहे. त्यावर प्रतिनिधी तिला म्हणाला की, “मॅडम, काय करत आहात? मी प्रश्न विचारत आहे”. या सगळ्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तिच्या या वागण्यावर नेटकऱ्यांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
#WATCH | Delhi: BJP MP-elect and actor Kangana Ranaut arrived at the Parliament for NDA Parliamentary party meeting. pic.twitter.com/Q6C7SgQg0J
— ANI (@ANI) June 7, 2024
दरम्यान जेव्हापासून कंगना निवडून आली आहे तेव्हापासून ती सतत वादात असल्याचे दिसून येत आहे. चंदीगढ येथे घडलेल्या प्रकरणावरदेखील तिने स्वतः माहिती देत सांगितले की, “सदर प्रकार घडल्यानंतर मला माझ्या शुभचिंतकांचे फोन आले. पण मी ठीक आहे. एअरपोर्टवर जो प्रकार घडला ते सिक्युरिटी दरम्यान घडले. मला तिथे एका महिला कॉन्स्टेबलने कानाखाली मारले व शिव्या दिल्या. असे करण्याचे कारण विचारताच तिने शेतकऱ्यांच्या आंदोलाचे समर्थन करत असल्याचे उत्तर दिले”.
पुढे ती म्हणाली की, “मला ज्या महिलेने मारले ती CISF गार्ड आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन करत आहे. पण मला वाटते की पंजाबमध्ये आतंकवाद व उग्रवाद वाढला आहे. यावर काहीटरी करणे गरजेचे आहे”. या सर्व वादांमुळे तिच्या राजकारणातील भविष्य काय असेल? यावर प्रश्न उपस्थित राहिले आहेत.