अभिनेत्री जास्मिन भसीन सध्या कठीण काळातून जात असल्याचं समोर आलं. अभिनेत्रीला डोळ्यांचा त्रास झाला असल्याचा खुलासा तिने केला आहे. याबाबत बोलताना अभिनेत्रीने असं काही सांगितलं की, ज्यामुळे साऱ्या प्रेक्षकांमध्ये काळजीच वातावरण निर्माण झालं आहे. डोळ्यांच्या परिस्थितीबाबत सांगताना अभिनेत्रीने असा खुलासा केला की, “अलीकडे मी लेन्स लावून घेतले. आणि त्यानंतर माझे डोळे खराब झाले, दुखू लागले. डोळ्यांची जळजळ वाढली आणि काही वेळाने मला दिसणे बंद झाले”. (Jasmine Bhasin)
जास्मिनने सांगितले की, १७ जुलैला ती एका कार्यक्रमासाठी दिल्लीत होती. “यावेळी मी तयार होत असताना तिने लेन्स लावली. लेन्स लावल्याबरोबर डोळे जळजळू लागले. मला ताबडतोब डॉक्टरांकडे जायचे होते पण कामामुळे मी त्यावेळी जाऊ शकले नाही. आणि त्यावेळी मी आधी कार्यक्रमाला आणि नंतर डॉक्टरांकडे जायचं ठरवलं”. जस्मिन म्हणाली की, “मी संपूर्ण कार्यक्रमात सनग्लासेस घातले होते. माझी टीम मला कार्यक्रमात मदत करत होती कारण काही वेळानंतर मला काहीच दिसत नव्हते. माझ्या डोळ्यांची दृष्टी गेली”.
या घटनेनंतर अभिनेत्रीला त्याच रात्री नेत्रतज्ज्ञांकडे जावे लागले. तिथे डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या डोळ्यांचा कॉर्निया खराब झाला आहे. यानंतर अभिनेत्रीच्या डोळ्यांवर पट्टी लावण्यात आली. अभिनेत्री मुंबईत परतली असून तिच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. जास्मिन तिच्या डोळ्यांवर उपचार घेत आहे. सध्याच्या परिस्थितीबद्दल तिने असे सांगितले की, “मला अजूनही खूप वेदना होत आहेत. डॉक्टरांनी सांगितले होते की मी चार ते पाच दिवसात बरी होईन पण तोपर्यंत मला माझ्या डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी लागेल. हे माझ्यासाठी सोपे नाही कारण मी काहीही पाहू शकत नाही आहे. या दुखण्यामुळे मला रात्री झोपायला त्रास होत आहे”.
जस्मिनला आशा आहे की ती लवकरच कामावर परतेल. ती असेही म्हणाली आहे की, “चांगली गोष्ट म्हणजे मला काम पुढे ढकलावे लागले नाही, मला आशा आहे की मी लवकरच बरी होऊन कामावर परतेन”.