बॉलीवूड म्हणजे फक्त चित्रपट चित्रपट आणि चित्रपट नसतंच इथे कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. गॉसिप हा सुद्धा बॉलीवूडचा एक अविभाज्य घटक आहे असं म्हणायला हरकत नाही. असच एक गॉसिप जे आता सर्वत्र पसरलं आहे ते म्हणजे अभिनेत्री इलियाना डिक्रूझच्या प्रेग्नन्सी बद्दल. इलियाना ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरते त्याला कारण देखील तसेच आहे.(Ileana D’Cruz pregnancy)
इलियानाने पोस्ट केलेल्या पोस्ट मध्ये तिने तिच्या होणाऱ्या बाळासाठी असलेल्या कपड्यांचा आणि एका चेन वर ‘ममा’ असं लिहिलेला पेंडेंटचा फोटो पोस्ट केला आहे मात्र कुठेही होणाऱ्या बाळाच्या बाबांचा उल्लेख तिने केला नाही किंवा तीच लग्न झालं असल्याच्या ही बातम्या कुठे कधी व्हायरल झाल्या नाहीत. मग इलियानाच्या होणाऱ्या बाळाचे बाबा नक्की कोण हे कळण्यास कोणतंही मार्ग तूर्तास तरी उरला नाही.

या पोस्टच्या कमेंट्स नि देखील चाहत्यांची ही उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. कमेंट बॉक्स मध्ये इलियानाची आई समिरा डिक्रूझ यांनी कमेंट करत लिहिले आहे कि ‘या जगात लवकरच माझ्या नातवाचे स्वागत होईल. मी फार उत्सुक आहे.’ तर एका चाहत्याने ‘लग्न कधी झालं’, असा सवाल केला. तर ‘बाळाचा होणारा पिता कोण आहे’, असंही दुसऱ्या युजरने विचारलं. ‘इलियानाने लग्न कधी केलं? हे दत्तक घेतलेलं बाळ आहे का? अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केला आहे’, नक्की चाललंय तरी काय असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलंय.(Ileana D’Cruz pregnancy)
हे देखील वाचा – आणि लक्ष्मीकांत निवेदिता सराफ यांना म्हणाले’बाई, एक लक्षात ठेव, तू चुकीचा सराफ शोधलास’
गेल्या काही दिवसांपासून इलियाना ही अभिनेत्री कतरिना कैफचा भाऊो सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याची चर्चा होती. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासोबत हे दोघं पार्टी करतानाही दिसले होते.