Hina Khan Received Threats : टेलिव्हिजन आणि बॉलिवूड कलाकारांवर भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाचा परिणाम दिसून येत आहे. सध्या सर्वत्र भारत-पाकिस्तान युद्धाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरची मोहीम आखत पाकिस्तानला चांगलीच अद्दल शिकवली. यानंतर कलाकार मंडळी सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करताना दिसले. दरम्यान, अभिनेत्री हिना खानने एक पोस्ट शेअर केली आणि म्हणाली की, भारताला पाठिंबा दिल्याने तिला धमक्या मिळत आहेत. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना योग्य उत्तर देखील दिले आहे. पाकिस्तानच्या चाहत्यांना हिना खानने चांगलेच सुनावलेले पाहायला मिळत आहे.
हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, “मी एक कलाकार आहे, म्हणून मी नेहमीच सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या आधी आणि नंतर, आपल्या देशाला समर्थन दिले म्हणून मला अनेकांनी अनफॉलो केले, तर काहींनी अनफॉलो करण्याची धमकी दिली. हिनाने लिहिले की, “काही लोक धमक्यांसह अत्याचार, अश्लील आणि अपमानकारक शब्द वापरत आहेत. त्याचे शब्द माझ्या आजारपणासाठी, कुटुंब आणि माझ्या धर्मासाठी आहेत”.
आणखी वाचा – जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

हिना खान पुढे असंही म्हणाली आहे की, “आपण माझ्या देशाचे समर्थन करता अशी मी अपेक्षा करीत नाही. आपण आपल्या देशाचे समर्थन करता हे ठीक आहे. परंतु या वेळी आपण कमीतकमी मानवता दर्शविली पाहिजे, मी तुमच्या सर्वांसाठी जितके करीत होतो तशीच वागणूक मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. पण मला वाटते की हा आपल्यातला फरक आहे”.
हिनाने शेवटी असेही लिहिले की, “मी एक भारतीय नाही तर काहीच नाही. मी नेहमीच प्रथम भारतीय राहील. त्यामुळे तुम्ही लोक मला अनफॉलो करु शकता, मला हरकत नाही. मी कधी वाईटाचे समर्थन केले नाही तर माझ्या देशाला समर्थन दिले आहे”. पूर्वी हिना खानने असे म्हटले होते की युद्धामध्ये कोणीही जिंकत नाही, फक्त निर्दोष लोक मरतात”, अभिनेत्रीचे हे विधानही बरेच चर्चेत आले होते आणि अनेकांनी तिच्या या विधानाचे कौतुकही केलेले पाहायला मिळाले.