मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुंबईतील महागड्या ठिकाणी अथिया शेट्टी व के. एल. राहुल यांनी खरेदी केलं अलिशान घर, किंमत ऐकून व्हाल थक्क

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 18, 2024 | 12:17 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
k.l. rahul and athiya shetty new house

मुंबईतील महागड्या ठिकाणी अथिया शेट्टी व के. एल. राहुल यांनी खरेदी केलं अलिशान घर, किंमत ऐकून व्हाल थक्क

बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी ही सध्या खूप चर्चेत आहे.  भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुलबरोबर अथिया मागील वर्षी ती लग्नबंधनात अडकली. दोघांच्याही लग्नाची सर्वत्र चर्चा झाली. अगदी साध्या पद्धतीने अथिया व राहुल यांचे लग्न पार पडले. त्यानंतर अनेकदा अथिया गरोदर असण्याच्या चर्चादेखील अधिक प्रमाणात रंगल्या होत्या. मात्र यावर स्वतः सुनीलने भाष्य करुन तो सध्या आजोबा होणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अथिया व राहुल हे नुकतेच राधिका व अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यासाठी हजर असलेले दिसले. मात्र सध्या ते आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. (k.l. rahul and athiya shetty new house)

अथियाने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिला हवे तसे यश मिळू शकले नाही. लग्नानंतर ती अभिनयापासून दूर असलेलीही दिसून आली. मात्र के. एल. राहुल त्याच्या खेळामुळे नेहमी चर्चेत असतो. अशातच त्यांच्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. दोघांनी आता नवीन घर खरेदी केले आहे. मुंबईमधील अपस्केल पाली हिल परिसरात एक अलिशान घर खरेदी केलं असून त्याची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. या अलिशान घराचं क्षेत्रफळ 3,350 स्क्वेअर फुट आहे तसेच संधु पॅलेस बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर आहे.

आणखी वाचा – मलायका अरोराच्या आयुष्यातून अर्जुन कपूरचा पत्ता कट?, मिस्ट्री मॅनबरोबर परदेशात करतेय एन्जॉय, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

याबद्दलची माहिती IndexTap.com या प्रॉपर्टी कंपनीकडून मिळाली आहे. यानुसार, या बिल्डिंगला बीएमसीकडून पार्शियल ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालं आहे. अथिया व राहुलने या घरासाठी तब्बल 1.20 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्यूटी व 30,000 रुपये नोंदणी फी भरली आहे. या बिल्डिंगमध्ये चार पार्किंग आहे. या घराची किंमत 20 कोटी रुपये सांगितली जात असून घराची नोंदणी 15 जुलै रोजी झाली आहे.

आणखी वाचा – अप्पीचे प्रेम स्वीकारण्यास अर्जुनचा नकार, आर्यानेही चांगलंच खडसावलं अन्…; आता सिंबा त्यांना एकत्र आणू शकेल का?

अथिया व राहुल यांनी ज्या भागात घर घेतलं आहे त्या भागात अनेक कलाकारांची घरं आहेत. दिलीप कुमार, आमिर खान अशा बड्या व्यक्तींची घरं या भागात आहेत. तसेच सलमान खान, शाहरुख खान, सैफ अली खान, जान्हवी कपूर यांचीही घरं या भागात आहेत.

Tags: athiya Shettyk.l. rahulnew housesuniel shetty
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Famous influencer Anvi Kamdar died after falling into a 300 feet deep gorge know more

रीलच्या नादात आयुष्य गमावलं, ३०० फूट खोल दरीत कोसळल्याने प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सरचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.