अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली हे बॉलिवूडच्या लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. अनुष्का व विराट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. दोघेही एकमेकांच्या कायम पाठीशी असतात. एकमेकांच्या कामाचा आदर करत ते एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. दरम्यान, अनुष्का शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये विराटला सपोर्ट करताना दिसली. आयपीएल २०२४ मध्ये अनुष्का विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर म्हणजेच RCB ला सपोर्ट करताना दिसली आहे. पण अलीकडेच RCB अंतिम फेरीत पोहोचण्याआधीच बाहेर पडले, याची खंत अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. (Anushka Sharma Upset)
आरसीबीचा राजस्थान रॉयल्सकडून चार विकेट्सने पराभव झाला, त्यानंतर ते अंतिम फेरीतून बाहेर पडले. दरम्यान, एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर निराशा पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा स्टेडियमच्या व्हीआयपी बॉक्समध्ये दिसत आहे. या सामन्याबद्दल तिच्या मैत्रिणींशी बोलताना अभिनेत्री खूपच निराश दिसत आहे.
Anushka Sharma Herat broken 💔 his eyes 👀 tears when RCB loss the ELIMINATER match 💔💔💔
— Cricketman (@Manojy9812) May 23, 2024
THE QUEEN 👑
NOT RCB DAYS 🙂🥲#AnushkaSharma #RCBvsRR pic.twitter.com/kpTgomG3Ge
सामन्यादरम्यान समोर आलेले फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यापैकी काही व्हिडीओमध्ये अनुष्का विराटचा जयजयकार करताना दिसत आहे. याशिवाय अनुष्का स्मृती मंदानासह एका फोटोमध्ये पोज देतानाही दिसत आहे. यावेळी ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.
स्मृती मंदाना ही महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरूची कर्णधार आहे. हा फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या महिन्याच्या सुरुवातीला विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य पार्टी आयोजित केली होती, ज्याचे फोटो व व्हिडीओ खूप चर्चेत होते. २०१७ मध्ये अनुष्का-विराटचा शाही लग्नसोहळा उरकला. त्यानंतर हे दोघे वामिका आणि अकाय दोन मुलांचे पालक झाले.