गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

म्हातारपण लपवण्यासाठी शाहरुख खानचे अथक प्रयत्न, चेहऱ्या लपवताच नेटकऱ्यांनी हिणवलं, म्हणाले, “चेहऱ्यावरील सरकुत्या…”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 3, 2025 | 11:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shahrukh khan hide face

चेहरा लपवल्यानंतर नेटकऱ्यांनी शाहरुख खानवर निशाणा

सध्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान खूप चर्चेत असलेला बघायला मिळत आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम करताना पाहिलं आहे. संपूर्ण जगभरात त्याचे खूप चाहते आहेत. मात्र सध्या तो कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच तो पत्नी गौरी खान व छोटा मुलगा अबराम खानबरोबर नवीन वर्षाच्या स्वागत करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या जामनगर येथील निवासस्थानी पोहोचला होता. यावेळी त्याच्या लूकबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. अशातच आता तो पार्टी करुन मुंबईला परतला आहे. यावेळीदेखील तो पत्नी व मुलाबरोबर पुन्हा एकदा एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. त्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. (shahrukh khan hide face)

काही दिवसांपूर्वी शाहरुखने चेहऱ्यावर हुडी घेतल्याने त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते. अशातच आता पुन्हा एकदा त्याच्या लूकमुळेच त्याच्यावर निशाणा साधला आहे. जेव्हा शाहरुख मुंबईमध्ये परतला तेव्हा त्याच्याबरोबर त्याची मॅनेजर पूजा ददलानीदेखील दिसून आली. अभिनेत्याला सुरक्षादेखील असल्याचे बघायला मिळाले. यावेळी शाहरुखने काळ्या रंगाची हुडी परिधान केली होती. यावेळी  त्याचा चेहरा पुन्हा झाकलेला बघायला मिळाला. यामुळे आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असलेली बघायला मिळाली.

आणखी वाचा – निर्मात्यांनी गोविंदाची फसवणूक करत पैसे दिले नाहीत अन्…; पत्नी सुनीता अहुजाचा खुलासा, म्हणाल्या, “मी माझा हक्क…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एक नेटकरी म्हणाला की, “हा चेहऱ्यावरील सुरकुत्या तर लपवत नाही आहे ना?”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “याला असं बघून राज कुंद्राची आठवण आली”. तसेच अजून एकाने लिहिले की, “याला चेहरा दाखवायला काय समस्या आहे?”, अजून एकाने लिहिले की, “जेव्हापासून आर्यनचे प्रकरण झाले आहे तेव्हापासून तो मीडियावर नाराज आहे”.

आणखी वाचा – “माझं आयुष्य बदलणारी एक संधी आणि…”, ‘टाइमपास’ला ११ वर्षे झाल्यानंतर प्रथमेश परबला आठवला दगडू, म्हणाला, “अजूनही कौतुक करतात तेव्हा…”

जामनगर येथे पोहोचण्याआधी शाहरुख कुटुंबासहित अलिबागवरुन परतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखने अलिबाग येथील अलिशान फार्महाऊसवर विकेंड घालवला. यावेळी शाहरुखच्या हातात त्याचा पाळीव श्वान असलेलाही दिसत आहे. मात्र इथे त्याने हुडीमध्ये चेहरा लपवला आहे. अंबानी यांच्या पार्टीसाठी अभिनेता सलमान खानदेखील जबरदस्त परफॉर्म करताना दिसून आला होता.

Tags: hide faceJamnagarshahrukh khan
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben

दयाबेन परतणार नाहीच! 'तारक मेहता…'च्या निर्मात्यांचे सगळेच प्रयत्न फसले, असित मोदी म्हणाले, "जवळचं नातं तरीही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.