शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भावाच्या निधनामुळे पुरता कोलमडून गेला राहुल देव, आई-वडिलांचं जाणं मुकूलला सहन झालं नाही अन्…; लेक एकटीच राहिली

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 24, 2025 | 1:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Brother Rahul dev on mukul dev death

भावाच्या निधनामुळे पुरता कोलमडून गेला राहुल देव, आई-वडिलांचं जाणं मुकूलला सहन झालं नाही अन्...

Mukul Dev Passes Away : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता मुकूल देवचं निधन झालं आहे. शुक्रवारी (२३ मे) दिल्ली येथे मुकूलने शेवटचा श्वास घेतला. त्याच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण कलाविश्वालाच मोठा धक्का बसला. अवघ्या ५४व्या वर्षी मुकूलने जगाचा निरोप घेतला. त्याने आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबरीने हिंदी मालिकांमुळे मकूल घराघरांत पोहोचला. मात्र गेल्या काही काळापासून मुकूल फार कुठे दिसला नाही. त्याच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. मुकूल बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता राहुल देवचा भाऊ आहे. राहुलने आता भावाच्या निधनाबाबत पोस्ट शेअर केली आहे. (Brother Rahul dev on mukul dev death)

राहुल व मुकूल दोन्ही भावांनीही चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. दोन्ही भावांचंही एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम होतं हे काही फोटोंमधून दिसूनच येतं. मुकूलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे राहुलचे काही फोटो शेअर केले होते. तसेच भावावरचं प्रेम व्यक्त केलं. राहुलचं भरभरुन कौतुकही केलं. आता भावाच्या जाण्याने राहुलवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत मुकूलच्या निधानाबाबत अधिकृत माहिती दिली.

आणखी वाचा – अवघ्या ५०शीमध्ये बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट, कुटुंबियांना मोठा धक्का

View this post on Instagram

A post shared by Rahul Dev (@rahuldevofficial)

राहुल म्हणाला, “काल रात्री दिल्लीमध्ये माझा भाऊ मुकूल याचं निधन झालं. त्याच्या पश्चात त्याची मुलगी सिया देव आहे. भावंड रश्मी कौशल, राहुल देव आणि पुतण्या सिद्धांत देवला त्याची आठवण येईल”. त्याचबरोबरीने राहुलने मुकूलच्या अंतिम यात्रेबाबात माहिती दिली आहे. तसेच त्याच्यावर अत्यंसंस्कार कधी होणार? याविषयी सांगितलं. दिल्ली येथील मुकूलच्या राहत्या घरापासून सायंकाळी ५ वाजता अंतिम यात्रेला सुरुवात होणार आहे. भावाला शेवटचा निरोप देताना राहुलला कठीण जात आहे.

आणखी वाचा – वैष्णवी हगवणे प्रकरणात जाऊबाईचाही मोठा हात?, नवऱ्याला पाठिशी घालत असल्याचे आरोप, मयुरी म्हणाली, “माझ्या नवऱ्याला विनाकारण…”

आई-वडिलांच्या निधनानंतर मुकूलने स्वतःला घरातच कोंडून घेतलं होतं. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातच त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याला एक मुलगीही आहे. मुकूलने आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. १९९६ला ‘मुमकिन’ मालिकेतून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं. ‘वजूद’, ‘कोहराम’, ‘मुझे मेरी बीवी से बचाओ’, ‘यमला पगला दीवाना’, ‘सन ऑफ सरदार’, ‘आर राजकुमार’, ‘जय हो’ सारख्या चित्रपटात मुकुलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. ‘कहीं दिया जले कहीं जिया’, ‘कहानी घर घर की’, ‘प्यार जिंदगी है’ यांसरख्या त्याच्या मालिका विशेष गाजल्या.

Tags: bollywood actorbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Viral Video
Lifestyle

Video : गरम सहन न झाल्याने आई लेकरांना घेऊन थेट एटीएममध्येच झोपली, मस्त एसीमध्ये आराम करत होती आणि…

मे 24, 2025 | 7:00 pm
Indian army sandip pandurang gaikar was martyred
Women

दीड वर्षाचा लेक कडेवर, पतीला शेवटचं पाहताना सॅल्युट अन्…; शहीद संदीप गायकरांच्या पत्नीला पाहून हजारो उपस्थित रडले, भावुक क्षण

मे 24, 2025 | 5:53 pm
actor Rahul dev brother mukul dev suffered loneliness
Entertainment

घटस्फोट, लेकीलाही घेऊन गेली, आई-वडिलांचं निधन अन्…; एकटेपणामुळे राहुल देवच्या भावाचा अंत?, शेवटची पोस्ट व्हायरल

मे 24, 2025 | 4:57 pm
secrets of a long and happy marriage
Lifestyle

घटस्फोट, ब्रेकअपच्या जगात नातं टिकवण्यासाठी तुम्ही काय करता?, आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी हे सात मार्ग फॉलो केले तर..

मे 24, 2025 | 3:38 pm
Next Post
mohit raina unfollowed his wife

'देवो के देव…'मधील शिव खऱ्या आयुष्यात अडचणीत, बायकोबरोबरच्या वादानंतर तीन वर्षांचा संसार मोडणार?, अनफॉलो केलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.