रेखा या मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहेत. रेखा यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. रेखा यांची लव्हलाईफ अनेकदा चर्चेत राहिली आहे. बॉलिवूडमध्ये कार्यरत असताना अनेकदा अनेक अभिनेत्यांबरोबर त्यांचे नाव जोडले गेले आहे. नवीन निश्चल याच्यानंतर जितेंद्रने किरण कुमार आणि नंतर विनोद मेहरा यांच्याशीही त्यांचे नाव जोडले गेले होते. विनोद मेहराबरोबरच्या त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्याही आल्या होत्या. पण रेखा यांनी नेहमीच या सर्व गोष्टींचे खंडन केले. (Jeetendra kapoor on rekha)
मात्र या क्षेत्रांमध्ये त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झालेली दिसून येते. अफेअरच्या चर्चांदरम्यान रेखा यांच्याबद्दल अनेकांनी वादग्रस्त वक्तव्यदेखील केली आहेत. एका अभिनेत्याने तर त्यांना टाइमपासदेखील म्हटल्याचे समोर आले आहे. एक असा काळ होता जेव्हा रेखा व जितेंद्र यांची जोडी मोठ्या प्रमाणात हिट झाली होती. त्यावेळी त्यांचे अफेअर सुरु असल्याच्या चर्चादेखील मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. मात्र अचानक काही कारणांमुळे त्यांच्यामध्ये दुरावा आला आणि तिथेच त्यांचे नाते तुटले.
त्यानंतर एकदा जितेंद्र यांनी रेखा यांच्याबद्दल असे काही वक्तव्य केले की रेखा यांच्याकडे सगळ्यांची दृष्टी बदलली आणि त्या एक मस्करीचा विषय झाल्या. या गोष्टीचा रेखा यांना खूप त्रास झाला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये अजूनच कडवटपणा आला. हा प्रकार नक्की काय होता त्याबद्दल आता जाणून घेऊया. जितेंद्र यांनी एका ज्युनिअर आर्टिस्टसमोर रेखा व त्यांच्या नात्याला एक टाइमपास असल्याचे सांगितले. ही गोष्ट रेखा यांना समजल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं.
जितेंद्र व रेखा यांनी ‘एक बेचारा’ या चित्रपटादरम्यान जवळीकता वाढली होती. ते दोघं एकमेकांना पसंतदेखील करु लागले होते. रेखा यांच्या बायोग्राफीमध्ये जितेंद्र यांच्याबद्दल लिहिण्यात आले होते. जितेंद्र यांच्याबद्दल रेखा यांच्या मनात प्रेम होते. ते जेव्हा सेटवर यायचे तेव्हा रेखा यांच्या डोळ्यात एक चमक पाहायला मिळायची. एका मुलाखतीमध्येदेखील जितेंद्र यांच्याबद्दल मनात खूप तिरस्कार असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.