बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र आता ते कोणत्याही अभिनयामुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने नुकतेच त्यांना ‘गरम धरम ढाबा’ संदर्भात धर्मेंद्र व इतर दोघांच्या विरोधात समन्स जारी केला आहे. न्यायिक मॅजिस्ट्रेट यशदीप चहल यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या समन्समध्ये व्यावसायिक सुशील कुमार यांच्याकडून दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात आहे. यामध्ये त्यांना या फ्रेंचायजीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले गेल्याचे सांगितले आहे. यामध्ये जमीन खरेदी करण्यासाही ६३ लाख रुपये मागितले असल्याचे म्हंटले आहे. मात्र नंतर आरोपींनी धोका दिला आहे. यामुळे सुशील यांना खूप नुकसानदेखील सहन करावे लागले. (dharmendra ji police complaint)
दरम्यान जारी केलेल्या समन्समध्ये म्हंटले आहे की, “असलेल्या पुराव्यांमधून हे सिद्ध होत आहे की आरोपींनी तक्रारदाराला प्रभावित केले आहे. त्यामुळे काही काळानंतर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कोर्टाने धर्मेंद्र यांच्यासहित दोन आरोपींना कलम ४२०, कलम १२०b व कलम ३४ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाची आता खोलवर तपासणी करण्यात येईल असंही सांगण्यात आले आहे.
दरम्यान तक्रारदराने तक्रार दाखल करताना सांगितले की, दिल्लीतील कॅनॉट प्लेस व हरियाणा मुरथलमध्ये या रेस्टॉरंटची ब्रांच प्रत्येक महिन्याला ७० ते ८० लाख रुपयांचा व्यवसाय होता. तक्रारदराला गुंतवणुकीतील सात टक्क्यांचा फायदा होईल. यासाठी ४१ लाखांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच उत्तर प्रदेशमध्ये फ्रेंचायजी सुरु करण्यासाठी पूर्ण मदत केली जाईल असे आश्वासनही देण्यात आले होते.
या सगळ्या प्रकारानंतर दोन्ही पार्टीमध्ये अनेक मीटिंगदेखील झाल्या. मात्र यावेळी पैशाची मागणी वाढवण्यात आली. दरम्यान तक्रारदारांकडून १७.७० लाख रुपयांचा चेकदेखील मागण्यात आला होता. यानंतर आरोपीनी तक्रारदारांशी असलेलं संपर्क पूर्णपणे तोडला होता. दरम्यान यामध्ये धर्मेंद्र यांचे नाव आल्याने मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. यावर धर्मेंद्र यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.