बॉलिवूडमधील एव्हरग्रीन जोडी म्हणजे अभिनेता धर्मेंद्र व ड्रीमगर्ल् हेमा मालिनी. गुरुवारी त्यांच्या लग्नाचा 44 वा वाढदिवस झाला. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हे फोटो शेअर करत त्यांनी ‘लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन असे लिहिले आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. या फोटोमध्ये दोघांच्याही गळयात हार असलेले पाहायला मिळत आहेत. यानंतर त्यांच्या आयुष्यातील सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. धर्मेंद्र व हेमा यांची जोडी मनोरंजन विश्वामध्ये खूप पसंत केली जाते. परंतु यांच्या लग्नाची गोष्टदेखील फिल्मी होती असे अनेकदा खुद्द हेमा यांनी सांगितले आहे. (dharmendra and hema malini wedding anniversary)
हेमा व धर्मेंद्र याची पाहिली भेट 1970 साली एका चित्रपटाच्या वेळी झाली होती. त्यावेळी ‘तुम हसीन मै जवान’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. या चित्रपटातील दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली होती. या चित्रपटाच्या दरम्यानेच दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही लग्न करणारच होते मात्र धर्मेंद्र आधीपासूनच विवाहित असल्याने हेमा यांचे आई वडील या लग्नासाठी तयार नव्हते. त्यानंतर अनेक समस्यांचा सामना करुन अखेर दोघे 1980 साली लग्नबंधनात अडकले. दोघांना ईशा व अहाना अशा दोन मुली आहेत.
आणखी वाचा – भारती सिंग रुग्णालयामध्ये भरती, आईला बेडवर पाहून लेकाची वाईट अवस्था, म्हणाली, “संपूर्ण घरभर तो मला…”
दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलगी ईशाने देखील फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. तिने दोघांबरोबरचा फोटो शेअर करत ‘लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे लिहिले आहे.
More photos for you pic.twitter.com/20naRKL8gA
— Hema Malini (@dreamgirlhema) May 2, 2024
हेमा व धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर हेमा या ‘शिमला मिर्ची’ या चित्रपटामध्ये दिसून आल्या होत्या. हा चित्रपट २०२० साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर मात्र हेमा कोणत्याची चित्रपटामध्ये दिसल्या नाहीत. तसेच धर्मेंद्र हे शाहीद कपूरच्या ‘तेरी बातो मे ऐसा उलझा जिया’ या चित्रपमध्ये दिसून आले होते. आता ते ‘इक्कीस’ या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसणार आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदादेखील दिसणार आहे.