Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सर्वच सदस्य ट्रॉफी जिंकण्यासाठी चढाओढ करताना दिसत आहेत. कालच्या टास्कमध्ये ‘बिग बॉस’ यांनी सर्व सदस्यांना असं सांगितलं की, निर्णय न घेऊ शकणारे असे दोन सदस्य तुमच्या मते कोण आहेत हे सांगायचे आहे. यावेळी ‘बिग बॉस’ यांनी दोन टीम पाडून दिल्या. दरम्यान या टास्कदरम्यान अंकिताने निक्की व सूरजचं नाव घेत साऱ्यांना धक्का दिला. मात्र सूरजला नॉमिनेट करण्यामागचं योग्य कारणही अंकिताने सांगितलं. यावेळी निक्की सूरजला भडकवताना दिसत आहे.
‘बिग बॉस’ अंकिताला या टास्कसाठी पहिलं बोलवतात. त्यावेळी अंकिता पुढे येते आणि म्हणते, “‘बिग बॉस’ मी पहिलं नाव घेईन ते म्हणजे निक्कीचं. मला असं वाटतं निक्की तिच्या मतावर ठाम नसते. आजचंच उदाहरण द्यायचं झालं तर ती आधी म्हणाली मी भांडी घासायची ड्युटी करेन. त्यानंतर झालेल्या चर्चांमध्ये दोन ड्युटी घ्यायचं ठरलं. त्याला तिने नकार दिला. शेवटी डीपी दादा म्हणाले की राहूदे काम आम्ही करतो आणि निक्कीने तेवढंच वाक्य धरुन ठेवलं. त्यामुळे मला असं वाटतं की ती तिच्या मतावर ठाम नाही, आणि तिला जे हवं ते ती समोरच्याकडून वधवून घेते”. यावरुन निक्की व अंकिता यांच्यात बाचाबाची होते.
त्यांनतर अंकिता दुसरं नाव सूरजचं घेते. अंकिता म्हणते, “बरेचसे टास्क असतात तेव्हा सूरजची निर्णयक्षमता कमी पडते. कोणतेही निर्णय तो घेऊ शकत नाही. बरेचदा तो दुसऱ्यावर अवलंबून असतो त्यामुळे स्वतःचे निर्णय तो देत नाही”. यावर निक्की सूरजला त्याच मत मांडायला सांगते. तेव्हा सूरज एका वाक्यात “मी बोलतो, कधी बोलत नाही”, असं म्हणतो. यावर निक्की मध्ये पडते आणि म्हणते, “ही असलीयत आहे. भाऊ भाऊ बोलून गळा पकडायचा”. यावर अंकिताही निक्कीला उत्तर देत म्हणते, “मी इथे नाती जपायला आले नाही आणि जी नाती जपायची आहेत ती बरोबर बाहेर जाऊन जपेन, तू त्याची काळजी करु नकोस”. यावर निक्की पुढे म्हणते, “तू इथे सहानुभूती दाखवायला बोललं नाही पाहिजे होतं की मी घर बांधणार आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss च्या घरात सांगकाम्याचा टास्क, मालकाची करावी लागणारं कामं, कोण कोणाच्या तालावर नाचणार?
यावर अंकिताही उत्तर देत म्हणते, “त्याच घर मी बाहेर गेल्यावर बांधणार आहे”. यावर निक्की म्हणते, “हो तेच तू इथे सांगायला नाही पाहिजे होतं. सहानुभूतीसाठी तू इथे बोललीस. तुझे हे डाव आम्हाला चांगले कळतात. तुला घर दिलं याचा इन्स्टाग्रामवर ती फोटोही टाकेल”. यावर अंकिता म्हणते, “बाहेर जाऊन मी नक्की करेन. तू टेन्शन नको घेऊस”. निक्की म्हणते, “तू घाण गेम खेळली ते मान्य कर. सहानुभूतीसाठी तू याचा वापर केला”.