‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा दबदबा असलेला पाहायला मिळाला. यंदाच्या या नव्या पर्वात कोल्हापूरच्या धनंजय पोवारच्या एण्ट्रीने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पहिल्या दिवसापासून धनंजयने स्वतःच मत मांडायला सुरुवात केली असून तो स्पर्धकांशी मिळून मिसळून वागताना दिसला. टीम बी मधून धनंजय खेळत असला तरी विरुद्ध टीममधील सदस्याबरोबरही त्याच चांगलं पटलं. धनंजय हा कंटेंट क्रियेटर बिझनेस मॅन तसेच Vlogger आहे. धनंजयच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दहा लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. (Dhananjay Powar On His Wife)
नंजय पोवार हा सतत कॉमेडी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत असतो. घरी आई अन् बायकोच्या आदेशाबाहेर न जाणारा धनंजय सध्या ‘बिग बॉस’चे आदेश ऐकत आहे. धनंजय प्रमाणेच त्याची पत्नीही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावरुन ती नेहमीच काही ना काही शेअर करत चर्चेत राहत असते. नवऱ्याचा खेळ पाहूनही धनंजयची पत्नी प्रतिक्रिया देताना दिसली. धनंजयच्या पत्नीचं नाव कल्याणी पवार असे आहे. कल्याणीचा साड्यांचा व्यवसाय आहे. ‘आईसाहेब वस्त्रम’ असे कल्याणीच्या साड्यांच्या ब्रॅण्डचं नाव आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरज मालक झाल्यानंतर जान्हवी-अंकिताला करायला लावली लावणी, गाणंही स्वतःच्याच आवडीचं अन्…
धनंजयची पत्नी कल्याणी ही उद्योजिका जरी असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच साधी आहे. तिचं राहणीमानही साधं, सिम्पल आहे. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये धनंजय ‘बिग बॉस’च्या घरातल्या स्पर्धकांसमोर बायकोबद्दल व्यक्त होताना दिसत आहे. बायकोची खरी किंमत त्याला कळली असल्याचं तो यावेळी सांगत आहे. तसेच त्याच्याही बायकोने थोडं स्वतःकडे लक्ष द्यावं याकडे तो स्वतः लक्ष देणार असल्याचं सांगताना दिसत आहे. वर्षा, जान्हवी, अंकिता यांचा मेकअपचा सेटअप, राहणीमान पाहून त्याच्या बायकोने असं कधीच केलं नाही, तिच्या कडेही सगळ्या गोष्टी असाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे.
आणखी वाचा – घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा लग्न करण्यास तयार नव्हती अर्चना पूरण सिंह, पाच वर्ष लहान मुलाशी विवाह केला अन्…
सगळे स्पर्धक चर्चा करत असतात तेव्हा वर्षा ताई डीपीला त्याच्या कुटुंबाबाबत विचारतात. तुम्ही फिरायला जाता का?, असं विचारतात, त्यावर उत्तर देत डीपी म्हणतो, “हा वर्षातून एकदा गेलो तर नाहीतर नाही. घरी सर्व चांगलं आहे. बोलणं वगैरे होतं पण फिरायला फार कमी जातो. दोन महिन्यातून एकदा जेवायला जातो. पण आता हे सगळं बदलणार. आता महिन्यातून एकदा जेवायला जाणार, दोन-तीन महिन्यात एकदा फिरायला जाईन. खरेदीला जाईन. आता तुमचं मेकअप वगैरे बघतो त्यातलं माझ्या बायकोकडे काही नाही. मी सुद्धा तिला प्रोत्साहन द्यायला हवं असं वाटतंय. माझ्या बायकोकडे सगळ्या गोष्टी असाव्यात असं मलाही वाटतं. रोजच्या जीवनात जसं तुमचा कपड्याचा सेन्स, मॅचिंग गोष्टी पाहतो तर असं वाटतं हे माझ्याही बायकोकडे असावं. फक्त तिच्याकडे एक ते दोन चपला आहेत. आता बायकोची खरी किंमत कळली”.