कलाकारांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे नक्की काय दडलंय? याची पुसटशीही कल्पना प्रेक्षकांना नसते. कितीह दुःख, वाईट प्रसंग वा खासगी आयुष्यात अडचण असेल तरीही कलाकारांना चेहऱ्यावर हसू ठेवावं लागतं. बऱ्याचदा तर काम करत असताना शारिरीक आजारांशीही कलाकार दोन हात करत असतात. असंच काहीसं आता अभिनेत्री निक्की तांबोळीबाबत घडलं आहे. निक्की चक्क रुग्णालयात आयसीयुमध्ये भरती होती. मात्र याची पुसटशीही कल्पना कोणाला नव्हती. काही दिवसांपूर्वीच निक्की मृत्यू अगदी जवळून पाहिला. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ करत असताना तर ती एकदम फिट होती. मात्र अचानक निक्कीवर प्रसंग ओढावला. याचबाबत तिने आता भाष्य केलं आहे. (nikki tamboli admitted in hospital)
निक्कीने तिच्या कठीण प्रसंगाबद्दल पहिल्यांदाच खुलेपणाने भाष्य केलं. पिंकव्हीलाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “एक गोष्ट कोणालाच माहित नाही. किंवा मी सोशल मीडियावर याबाबत काहीच बोलले नाही. चार दिवसांपूर्वी मी आयसीयुमध्ये होते. मी एका हॉटेलमध्ये मित्र मंडळींसह जेवायला गेले होते. शेलफिशची (कवच असलेले मासे) एलर्जी आहे हे मला माहितच नव्हतं. शेलफिश म्हणजे खेकडा, कोळंबी यांसारखे मासे”.
आणखी वाचा – सुपरस्टारलाही सासूरवास?, नमस्कार करण्यास खाली वाकताच सासूबाईंचा फराह खानला टोमणा, म्हणाल्या, “२० वर्षांत…”
“मी चार मोठ मोठ्या कोळंबी खाल्ल्या. त्यानंतर मला संपूर्ण एलर्जी झाली. माझ्या फुफ्फुसांना त्रास होऊ लागला. माझे डोळे सुजले. डोळे खूप मोठे वाटू लागले. चेहऱ्यावर कायतरी मुरमांसारखं आलं. संपूर्ण शरीराला खाज येऊ लागली. अंतर्गत इतर शारिरीक अवयवांना सूज आली. या सगळ्यामुळे मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पण हे खूप भयानक होतं. मला इतका त्रास होत होता की, व्हिलचेअरवर बसवून रुग्णालयात मला न्यावं लागलं. डॉक्टरांनी आयसीयुमध्येच भरती करण्यास सांगितलं”.
आणखी वाचा – “मीसुद्धा माझी लघवी प्यायली आहे”, परेश रावलनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली, “सुंदर त्वचेसाठी आणि…”
पुढे ती म्हणाली, “माझ्यावर योग्य ते औषधोपचार झाले. काही चांगल्या पद्धतीचे औषधं मला देण्यात आले. दोन दिवस मी आयसीयुमध्ये होते. मला असं वाटलं की, कोणाची तरी नजर लागली आहे”. या सगळ्या प्रसंगामध्ये निक्की एकटीच होती. तिच्या कुटुंबातील कोणीच निक्कीबरोबर नव्हतं. शिवाय बॉयफ्रेंड अरबाज खानही बरोबर नव्हता. एकटीने तिने या सगळ्या प्रसंगाचा सामना केला. आता एकदम ठणठणीत असल्याचं तिने चाहत्यांना सांगितलं आहे.