सगळ्या सुट्ट्यांचा राजा म्हणजे मे महिन्याची सुट्टी. सगळ्यांनाच हवीहवीशी वाटणारी उन्हाळ्याची ही सुट्टी अनेक अर्थाने खास असते. मे महिन्याच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचं, याचं प्लॅनिंग कित्येक महिने आधीच झालेलं असतं. कलाविश्वातीलही अनेक कलाकार मंडळीही त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढत मे महिन्याच्या सुट्टीमध्ये एन्जॉय करण्यासाठी बाहेर कुठेना कुठे फिरायला जात असतात. अशातच बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर ही तिच्या लेकीसह फिरायला जात आहे.
सई लोकूर तिच्या लेकीसह परदेशात फिरायला जात असून तिने आपल्या लेकीसाठी खास पासपोर्टही काढला आहे आणि याबद्दलचे एक खास पोस्ट तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. सई लोकूर ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या लेकीबरोबरचेही काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेला हा खास व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सईने लेकीबरोबरच्या प्रवासाबद्दलची एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “ताशीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सुट्टीची वेळ आली आहे. तिच्या आईला प्रवास करायला आवडतं आणि मला माझ्या मुलीमध्येही प्रवासाची ही आवड रुजवायची आहे. त्यामुळे मी आमच्या प्रवासाला शुभेच्छा देत आमचा प्रवास सुरु करत आहे.” तसेच सईने ती कोणत्या ठिकाणी फिरायला जात आहे? याबद्दल तिच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये सांगावे असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस १७’ फेम मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल, फोटोमुळे चर्चांना उधाण, नेमकं झालंय काय?
सईने शेअर केलेल्या या पोस्टला तिच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनी लाइक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच सई व तिची लेक राशी हिला आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी १७ डिसेंबर रोजी सईने तिच्या लेकीला जन्म दिला. “आमच्या आयुष्यात एका चिमुकल्या मुलीचं आगमन झालं आहे. सगळ्यांच्या प्रेमासाठी व शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.” असं म्हणत तिने तिच्या लेकीच्या जन्माची बातमी दिली होती.