सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धक्कादायक! ऊसतोडीला जाण्यापूर्वी हजारो महिलांनी गर्भपिशवीच काढली, भयाण सत्य समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 3, 2025 | 1:29 pm
in Women
Reading Time: 1 min read
google-news
Beed Female Sugarcane Workers Women

धक्कादायक! ऊसतोडीला जाण्यापूर्वी हजारो महिलांनी गर्भपिशवीच काढली, भयाण सत्य समोर

Beed Female Sugarcane Workers Women : महाराष्ट्रात असे अनेक दुष्काळी भाग आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बीड. बीड-दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या दुष्काळी जिल्ह्यातून अनेक कामगार पोटापाण्यासाठी मात्र त्यांच्या राहत्या जिल्ह्यातून बाहेर येत कामधंदा शोधतात. विशेषतः हे बीडवासी पश्चिम महाराष्ट्राकडे ऊस तोडणीला येतात. उसाच्या शेतात भर उन-पावसात ऊस तोडण्याचं जिकरीचं आणि धोकादायक काम त्यांना करावं लागतं. मात्र पोटापाण्यासाठी त्यांना ही लढाई करावीच लागते. यावेळी अनेक महिला कामगारही काही महिन्यांसाठी त्यांच्या घरापासून दूर येत कामधंदा करतात. कधीकधी त्यांना त्यांच्या लेकरांना सोडूनही हे सगळं जगण्यासाठी करण्याची वेळ त्यांच्यावर येते. यादरम्यान, या महिलावर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या गोड ऊसाच्या आणि त्यापासून तयार झालेल्या गोडव्यामागचं कडू वास्तव म्हणजे ऊसतोडणी करणाऱ्या या महिला. राहायला धड छत नाही, प्यायला चांगले पाणी नाही, पोट भरेल इतके अन्नही त्यांच्या वाटेला नाही, अशा परिस्थितीत ती महिला अहोरात्र मेहनत करते. मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास, गरोदरपणात पोटुशी बाळ असताना पोटासाठीची धडपड, बाळंतीण झाल्यावर डोक्यावरून वाहायचे ओझे या सगळ्याकडे ती महिला केवळ जबाबदारी आणि जगण्याची आशा म्हणून पाहते. अशातच या महिला वर्गाच्या जगण्यामागचं भयानक सत्य समोर आलं आहे.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, याच वर्षी केलं होतं लग्न, हत्येमागचं धक्कादायक सत्य समोर

हो बीड जिल्ह्यातील हजारो महिलांनी ऊसतोडणीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढली. बीड जिल्ह्यात ७८ हजार ऊसतोड महिला कामगार आहेत. ऊसतोडीला जाण्यापूर्वी ८४३ महिला मजुरांची गर्भपिशवी काढली गेली. गर्भपिशवी काढलेल्या महिलांमध्ये ३०-३५ वयोगटातल्या ४७७ महिला आहेत. यातील १ हजार ५२३ म्हणजेच सुमारे दीड हजार महिला आजही गरोदरपणातही ऊसाच्या फडात काम करत आहेत. ऊसतोड महिला कामगारांचं ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढण्याचं वाढलेलं प्रमाण चिंताजनक आहे. आता जेव्हा हे आकडे समोर आलेत, तेव्हा गांभीर्याने चर्चा सुरु झाली आहे.

आणखी वाचा – आयपीएलमधून मुंबई इंडियन्सची एक्झिट नीता अंबानीला पडली महागात, मोठं नुकसान, इतके कोटी…

बीडसारख्या जिल्ह्यांमध्ये गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांचं प्रमाण धक्कादायकपणे वाढलं आहे. मासिक पाळीच्या सामान्य प्रक्रियेला अडचण मानून, तिला मुळापासून उपटून काढलं जातं आहे. आणि याचा परिणाम म्हणजे या महिला मातृत्वाला मुकतायत, स्त्री म्हणून त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे असं वाटत आहे.

Tags: Beed Femalehealth newsWoman
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
usha Nadkarni ankita lokhande

“मला काय झालं तर कोण बघणार?”, ७९व्या वर्षीही एकट्याच राहतात उषा नाडकर्णी, परिस्थिती सांगताना रडू कोसळलं अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.