शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोकणातल्या गावी रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, शेती करत घेत आहे प्राण्यांची काळजी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “गावासारखं सुख…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 25, 2024 | 10:26 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss marathi fame actor Abhijeet Kelkar shared a special video of his village in Kokan and he is being appreciated for simplicity.

कोकणातल्या गावी रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, शेती करत घेत आहे प्राण्यांची काळजी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “गावासारखं सुख…”

पावसाळा सुरु झाला की सर्वांना वेध लागतात ते कोकणात जाऊन कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचे. अनेकजण पावसाळ्यात कोकणात फिरायला जातात. अनेकजण कोकणात जाऊन कोकणातील निसर्गसौंदर्य पाहण्याचा आणि गावच्या शेतीच्या कामाचा आनंद घेत असतात. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेता अभिजीत केळकरही कोकणात पोहोचला होता. यावेळी त्याने भातशेतीही केली होती. पावसात भिजत त्याने शेती करतानाचा आणि शेतातच जेवतानाचा अनुभव शेअर केला होता. हा अनुभव शेअर करत त्याने एक खास व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो भाताची लावणी करतानाही दिसला.

‘बिग बॉस’ मराठीमुळे अभिजीतला चांगलीच लोकप्रियता मिळाली. याशिवाय अभिजीतने अनेक मराठी मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आपल्या विविध भूमिकांनी चर्चेत राहणारा अभिजीत सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अभिजीत बरेचदा फिरतानाचे सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत तो अपडेट देत असतो. अशातच त्याने पुन्हा एकदा गावचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkar21)

आणखी वाचा – “हनिमूनवरुन आल्यावर राडा होणार”, अक्षरा-अधिपतीचा हनिमून व्हिडीओ पाहून प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, “दोघांचं नातं…”

अभिजीतने कोकणातील गावचा खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गुरांना पाणी पाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तो गायींना पाणी पाजत असून त्यांची नावेही सांगत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका गायीचे नाव हिरा असल्याचे सांगतो आणि एका वासरूचे नाव राणी असल्याचे सांगतो. हा खास व्हिडीओ शेअर करत त्याने “कोकणातल्या गावासारखं सुख नाही” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – नवऱ्याच्या नवीन कामानिमित्त ‘तुला शिकवीन…’ फेम अक्षराची खास पोस्ट, म्हणाली, “खूप अभिमान वाटतो की…”

दरम्यान, अभिजीतच्या या व्हिडीओला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “मस्त, “खूप छान”, “कोकणातल्या गावासारखं सुख नाही आणि कोकणी माणसासारखे सुखी कोणीच नाही”, “तुझ्या सारख्या निर्मळ मनाचा माणूसच अस करू शकतो बाकी सगळे फक्त दिखावा करतात. तू मनानं गर्भश्रीमंत आहेस अभी” अशा अनेक कमेंट्सद्वारे त्याचे कौतुक केलं असून अनेकांनी त्यांच्या गावाचे नावही विचारलं आहे.  

Tags: abhijeet kelkarAbhijeet Kelkar Konkan Videomarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Paaru Serial Update

अहिल्यादेवींचा राग अनावर, पारूला विचारला जाब, खरं सत्य काय हे पारू सांगणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.