bigg boss marathi 6 updates : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात आता स्पर्धकांची मनं दुखायला सुरुवात झाली आहे. दीपाली सय्यद या स्पर्धकामुळे आता राधा पाटील दुखावली गेली असल्याचं समोर आलं आहे. दीपालीच्या बोलण्याने राधाला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत. बार डान्सर असा उल्लेख करत दिपालीच्या बोलण्याने राधा पाटील दुखावली आहे. एकूणच दीपालीच बोलणं राधाला खटकलं असून तिच्या डोळ्यांत पाणी आलेलंही पाहायला मिळालं. राधा पाटील ही उत्तम नृत्यांगना असून तिचा महाराष्ट्रात खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिचा डान्स पाहायला चाहत्यांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. पण आता दीपाली सय्यद यांच्या म्हणण्याने राधा पाटीलच्या कलेला गालबोट लागलं आहे.
‘बिग बॉस’ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सगळेचजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात, तेव्हा दीपाली सय्यद म्हणते, “लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतात आणि तुम्ही चिट करताय”. दीपालीच म्हणणं सगळेचजण ऐकत असतात. तर इकडे राधा पाटील बाजूला येते आणि एका स्पर्धकाला म्हणते, “दीपाली ताई लावणी वरुन जे मला बोलतायत ना…, मी पण लायकी काढू शकते ना…”.
आणखी वाचा – “प्लिज डॉक्टर पाठवा”, ‘मिशन राशन’ टास्कमध्ये दिव्या शिंदे बेशुद्ध पडली आणि स्पर्धकांची झाली तारांबळ
तर दीपाली सय्यद म्हणते, “बार डान्सर जे तुम्ही स्टेजवर घेऊन येता…”, दिपालीच्या बोलण्याने राधाच मनं दुखावतं. आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं, राधा पाटील म्हणते, “ती पण तर डान्स करत होती, पण डान्समध्ये थोडी तिचं नाव आहे” . आता राधा पाटील आणि दीपाली सय्यद यांच्यात पडलेली वादाची ठिणगी केव्हा पेट घेणार हे पाहणं रंजक ठरेल. ‘बिग बॉस मराठी’ सिझन सहा जिओ हॉटस्टार आणि कलर्स मराठीवर रोज रात्री ८ वाजता पाहायला विसरू नका.





