रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ते डिलिव्हरीच काम करतात”, वडिलांच्या आठवणीत रुचिता जामदार रडली, म्हणाली, “भावाने खूप सॅक्रिफाईस केलं”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 13, 2026 | 12:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss marathi 6 updates

"ते डिलिव्हरीच काम करतात", वडिलांच्या आठवणीत रुचिता जामदार रडली, म्हणाली, "भावाने खूप सॅक्रिफाईस केलं"

bigg boss marathi 6 updates : बिग बॉस मराठी’ सीझन ६ मध्ये रुचिता जामदार प्राजक्ता शुक्रेसह तिच्या घराबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसत आहे. या संवादात रुचिता आपल्या कुटुंबाविषयी भावुक होताना पाहायला मिळते. रुचिता जामदार ही सुमारे ३६.८ हजार फॉलोअर्स असलेली एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. रुचिता ‘रोडीज डबल क्रॉस’ची स्पर्धक, ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ची विजेती आणि स्टार प्रवाहच्या ‘मी होणार सुपरस्टार’ची पहिली उपविजेती देखील होती. आता ‘बिग बॉस मराठी ६’मध्येही ती कल्ला करण्यासाठी सज्ज झाली आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून रुचिताने स्वतःच स्थान स्वतः बनवलं आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये रुचिता तिच्या वडिलांच्या आठवणीत भावुक होते आणि भावाबद्दलही सांगताना दिसते. ती प्राजक्ता शुक्रेसह बोलताना म्हणते की, “पप्पांशी शेवटचं फोनवर बोलणं झालंच नाही”. यावर प्राजक्ता तिला विचारते, “का गं?”. त्यावर रुचिता म्हणते, “मी फोन करत होते, पण तो फोन त्यांना उचलता आलाच नाही…”. पुढे ती सांगते की तिचे वडील एका डिलिव्हरी मॅनचं काम करतात आणि त्या कामात ते सतत व्यस्त असतात. हे सांगताना रुचिताच्या डोळ्यांत पाणी येताना दिसतं.

आणखी वाचा – “पहिला कोंबडा भेटला”, काळू डॉन जमिनीवरच झोपला आणि कोंबडा आरवताच…; यावर सागर कारंडेने असं केलं की…

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

यानंतर प्राजक्ता रुचिताला विचारते, “तुझा भाऊ किती मोठा आहे?”. त्यावर रुचिता उत्तर देते, “तो माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान आहे. त्याला क्रिकेट खेळायची खूप आवड होती.” प्राजक्ता पुन्हा विचारते, “खेळायची आवड होती म्हणजे” यावर रुचिता भावुक होत सांगते, “आमची परिस्थिती तशी नव्हती. क्रिकेट हा खूप खर्चिक खेळ आहे. माझं थोडंफार करिअर सुरू होतं, पण घरात एकाच जणावर खर्च करता येत होता. माझ्या लहान भावाला क्रिकेटमध्ये खूप पुरस्कार मिळाले आहेत, पण त्याने माझ्यासाठी खूप सॅक्रिफाईस केल,” असं म्हणत रुचिता ढसाढसा रडताना दिसते.

आणखी वाचा – “बार डान्सर…”, दीपाली सय्यदच्या बोलण्याने राधा पाटीलच्या डोळ्यांत पाणी, रडतच म्हणाली, “मी पण लायकी काढू शकते…”

रुचिता जामदार तिच्या बेधडक स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. बिग बॉसमध्ये एन्ट्री करताच रितेश देशमुखसोबत संवाद साधताना रुचिता म्हणाली, “छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरची लेक आहे. छुईमुई बाहुली नाही तर वाघीण आहे. थेट अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आले आहे. त्यामुळे यावेळेस लढायला मजा येणार आहे”.

Tags: Bigg Boss Marathi 6entertainmentRuchita Jamdar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
bigg boss marathi 6

आठ वर्षांपासून आजारी, महिन्याला रक्त बदलतो आणि…; जालन्याच्या काळू डॉनला आहे 'हा' गंभीर आजार, वॉशरूममध्ये ढसाढसा रडला आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.