बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरुषोत्तमदादा पाटील व वैभव चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घालण्यास सज्ज, कोण कोणावर भारी पडणार?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 12:24 pm
in Entertainment
Reading Time: 9 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Rapper Arya Jadhav, Arbaaz Patel, Vaibhav Chavan and kirtan artist Purushottamdada Patil entered the house.

अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरुषोत्तमदादा पाटील व वैभव चव्हाण 'बिग बॉस मराठी'च्या घरात धुमाकूळ घालण्यास सज्ज, कोण कोणावर भारी पडणार?

गेल्या अनेक दिवसांपासून अनेक चाहत्यांना ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वाची उत्सुकता लागून राहिली होती. ‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि हीच उत्सुकता आता पूर्ण होणार आहे. कारण ‘बिग बॉस’ मराठीचे पाचवे नवीन पर्व आता सुरु झाले आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती आणि अखेर या घरात स्पर्धकांची एंट्री झाली आहे.

आतापर्यंत दहा स्पर्धक घरात गेले असून यांची गेले काही दिवस सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु होती. या घरात आतापर्यंत वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, अभिनेता निखिल दामले, विनोदी अभिनेते पॅडी कांबळे, कलर्स मराठीच्या दोन अभिनेत्री म्हणजेच योगीता चव्हाण व कीर्ती किल्लेकर यांची एंट्री झाली आहे. यानंतर  ‘इंडियन आयडॉल’ फेम गायक अभिजीतने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

गायक अभिजीत सावंतसह या घरात आणखी दोन स्पर्धकांची एंट्री झाली आहे आणि यापैकी एक स्पर्धक म्हणजे छोटा पुढारी म्हणून लोकप्रिय असलेला घनश्याम दरवडे. तर दुसरी स्पर्धक परदेसी गर्ल इरिना रूडाकोवाने घरात प्रवेश केला आहे, तर निक्की तांबोळीनेही या घरात प्रवेश केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – रिलस्टार्सला ‘बिग बॉस मराठी’च्या घरात महत्त्वाचं स्थान, धनंजय पोवार, सुरज चव्हाणची एन्ट्री, शोमध्ये प्रत्येक प्रसंगाचा कसा सामना करणार?

अशातच आता घरात SplitsVilla चा स्टार अरबाज पटेल व बारामतीचा रांगडा गडी, वैभव चव्हाणने एंट्री केली आहे.  यांच्याबरोबरच ‘हसल’सारखारॅप शो केलेली गायिका आर्या जाधवनेही घरात एंट्री केली आहे. तसेच कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांनीही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. द्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा कोल्हापुरी गडी, धनंजय पोवार यांचीही बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – अभिजीत सावंत, छोटा पुढारी, परदेसी गर्ल व निक्की तांबोळीची ‘बिग बॉस मराठी’मध्ये धमाकेदार एन्ट्री, एकमेकांशी कसं जुळवून घेणार?

दरम्यान, ‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीसह जिओ सिनेमावरही पाहता येणार आहे. रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघता येणार आहे. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.   

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Grand PremiereBigg Boss Marathi 5 Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 popular reel stars Dhananjay Powar and Suraj Chavhan entered in the house

रिलस्टार्सला 'बिग बॉस मराठी'च्या घरात महत्त्वाचं स्थान, धनंजय पोवार, सुरज चव्हाणची एण्ट्री, शोमध्ये प्रत्येक प्रसंगाचा कसा सामना करणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.