Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ हा रिअॅलिटी शो सध्या प्रचंड चर्चेत आहे. सध्या या शोमध्ये एक वेगळाच राडा झाला आहे. निक्की तांबोळी व आर्या जाधव यांची एका टास्कमध्ये झटापट झाली. अन् त्या हाणामारीत आर्यानं चक्क निक्कीच्या थोबाडीत मारली. नियमानुसार ‘बिग बॉस’च्या घरात हिंसा करणं हा गुन्हा आहे आणि या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या स्पर्धकाला थेट घरातून बाहेर काढलं जाईल. पण उलट आर्यानं उचलेलं हे पाऊल पाहून मराठी प्रेक्षकवर्ग प्रचंड खुश झाला आहे. ‘तमाम महाराष्ट्राची इच्छा तू पूर्ण केलीस’ असं म्हणत नेटकऱ्यांनी आर्याचं कौतुक केलं आहे. मात्र आर्याच्या या वागणुकीवर आता ‘बिग बॉस’ काय निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अशातच निक्कीच्या आईनेदेखील त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Nikki Tamboli mother angry on Aarya Jadhav)
निक्कीच्या आईने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत निक्कीबरोबरच्या वर्तणूकीवर भाष्य केलं असून यात त्यांनी निक्कीला संरक्षण देण्याबरोबरच आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की , “नमस्कार मी प्रमिला तांबोळी, निक्कीची आई. काल (शुकवार) ‘बिग बॉस’च्या घरात जी घटना घडली. आर्याने निक्कीवर जो अटॅक केला. यावेळी आर्याने शारीरिक इजा केली आणि ही गोष्ट निंदनीय आहे. ‘बिग बॉस’ने यांची गंभीर दाखल घ्यायला हवी. आम्ही इथे राहून काहीच करु शकत नाही. पण आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात तिच्याबरोबर रोजचं असं काहीतरी घडत आहे. मागच्या आठडव्यात संग्रामने तिच्याबद्दल मोठमोठ्या गोष्टी केल्या आणि निक्कीला कल्पना न देता पाण्यात ढकळूण दिलं. हे काय वागणं आहे? हे असं व्हायला नाही पाहिजे. तिला काही त्रास झाला असता, तिच्या नाका-तोंडात पाणी गेलं असतं तर. पण ठीक आहे तिला काही त्रास झाला नाही. पण संग्रामने योग्य केलं नाही”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “अरबाज हे करतो अरबाज ते करतो असं म्हणत तुम्ही त्याचा बाऊ करता. पण असं त्याने नक्की काय केलं आहे. अरबाज कितीही आक्रमकपणा करत असला तरी त्याच्या आक्रमकतेमुळे कुणालाही इजा झालेली नाही. कुणाला दुखापत झाली नाही. पण निक्कीला त्रास झाला आहे. मागे एकदा आर्या निक्कीच्या हाताला चावली होती. तिच्या हाताला तिने इतकं घट्ट आवळून धरलं होतं की त्यामुळे निक्कीचा हात काळा झाला होता. त्याची ‘बिग बॉस’ने दखल घेतलेली दिसली नाही. शनिवार-रविवारच्या भाऊचा धक्कावर हे कधीच दाखवलं नाही. नको त्या गोष्टी उकरुन दाखवता पण निक्कीच्या बाबतीत सारखं-सारखं हे असं होत आहे”.
आणखी वाचा – आत्महत्या की अपघात?, मलायका अरोराच्या वडिलांच्या मृत्यूबाबत अनेक खुलासे, २४ तासात नक्की काय काय घडलं?
यापुढे निक्कीच्या आई या व्हिडीओमध्ये असं म्हणाल्या आहेत की, “काल (शुक्रवार) आर्याने टास्क खेळण्याऐवजी निक्कीला त्रास कसा द्यायचा?, तिला कसं अडवायचं?, तिला कसं खेळू द्यायचं नाही? हे वर्षा, अंकिता व आर्या यांनी ठरवलंच होतं. ‘बिग बॉस’ने ग्रुपही असा बनवला आहे की ज्यात निक्कीला त्रास देणाऱ्या सगळ्या एकत्र आहेत. आर्याने दार लावून घेतल्यानंतर ‘बिग बॉस’ने एकदाही म्हटलं नाही की आर्या हे खेळाच्या नियमात नाही. त्याचाच परिणाम हा झाला की पुढे आर्याने माझ्या मुलीला मारलं. त्यामुळे ‘बिग बॉस’ कृपया याची गंभीर दखल घेतली पाहिजे. हे खूप चुकीचे आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “त्याला सगळं कळतं”, अरबाजने वैभवकडे केली सूरजची चुगली, म्हणाला, “तो साधा माणूस नाही तर…”
पुढे निक्कीच्या आईने थेट ‘बिग बॉस’ला जाब विचारत “आमची मुलगी ‘बिग बॉस’च्या घरात मार खायला गेली आहे का?” असं म्हटलं आहे. शिवाय आर्याबद्दल त्यांनी असं म्हटलं आहे की, “‘बिग बॉस’ला माझी हात जोडून विनंती आहे की, माझ्या मुलीला शारीरिक संरक्षण मिळालं पाहिजे. तर आम्ही ‘बिग बॉस’चा शो पाहू शकतो. आमचा विचार करा, शो बघताना आम्हाला कसं वाटत असेल त्याचा विचार करा. आम्हाला ‘बिग बॉस’च्या घरात आर्या नको आहे. त्यामुळे तिला बाहेर काढा”.