शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 : अखेर ‘बिग बॉस’ने निक्कीचा माज उतरलावच, सर्वांसमोर वर्षाताईंची मागितली माफी, म्हणाली…

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 4, 2024 | 9:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Nikki Tamboli apologized to Varsha Usgaonkar and every Marathi manus of Maharashtra

Bigg Boss Marathi 5 मधील निक्कीने सर्वांसमक्ष वर्षाताईंची माफी मागितली.

Bigg Boss Marathi 5 Update : बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील पहिला वीकेंड स्पेशल एपिसोड काल (३ ऑगस्ट) रोजी प्रसारित करण्यात आला. यंदाच्या पर्वात ‘बिग बॉस मराठीच्या चावडी’ ऐवजी प्रेक्षकांना ‘भाऊचा धक्का’ अशा नावाने वीकेंड स्पेशल एपिसोड दाखवण्यात आला. रितेश देशमुखने ‘भाऊच्या धक्क्या’वर दणक्यात एन्ट्री घेतली, पण तेवढाच दणका त्याने सर्व स्पर्धकांनाही दिला. या भागात ‘भाऊचा धक्का’चे खास गाणेही पहिल्यांदाच वाजवण्यात आले. हे गाणे ‘बिग बॉस मराठी’च्या माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेने तयार केले आहे. यंदाच्या पर्वाचा पहिलाच आठवडा गाजला तो निक्कीच्या वागणुकीमुळे. वर्षा व निक्की यांच्या भांडणात निक्कीने वर्षाताईंचा अपमान केल्यामुळे धक्क्यावर येताच रितेश देशमुखने सुरुवातीपासूनच निक्कीला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. (Nikki Tamboli apologized to Varsha Usgaonkar)

रितेशने असे म्हटले की, “पहिला आठवडा निक्कीविषयीच होता. एकतर निक्की बोलत होती किंवा तिच्याविषयी लोक बोलत होते. खेळाडू म्हणून तू कमाल आहेस, पण माणूस म्हणून तुझ्यात काहीतरी अडचण आहे. तुझी भाषा चुकीची आहे आणि वर्षा ताईंशी बोलण्याची तिची भाषा या घरात खपवून घेतली जाणार नाही”. यापुढे रितेशने निक्कीला सुनावले की, “असली भाषा या मंचावर सहन केली जाणार नाही”. पुढे वर्षा यांनीही निक्कीची भाषा अजिबात आवडली नसल्याचे म्हटले. निक्की व तिच्या गटाचा उल्लेख वर्षाताईंनी ‘महामंडळ’ असा केला. यापुढे रितेशने वर्षा यांनाही “त्या एखादा मुद्दा खूप चघळत बसतात, चिंगमसारख्या त्याच त्याच गोष्टीला चघळत बसता” असं म्हटलं. त्यानंतर अभिजीतही वर्षा ताईंबद्दल बोलताना भावुक झाला.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “एक नंबर भाऊ”, रितेश देशमुखच्या होस्टिंगवर कलाकारांसह प्रेक्षकही खुश, कौतुक करत म्हणाले, “अख्ख्या महाराष्ट्राला…”

निक्कीने आर्याला “अशा मानसिकतेमुळे मी या शोमध्ये येणार नव्हते” असं म्हटलं होतं. त्यामुळे निक्कीने मराठी माणसाचा अपमान केल्याचे म्हणत रितेशने तिची चांगलीच शाळा घेतली. मराठी माणूसच शेवटी तिला ट्रॉफी जिंकण्यासाठी मदत करणार आहे, याची जाणीव रितेशने निक्कीला करुन दिली. या चुकीच्या विधानामुळे निक्कीने “आताच्या आता माझ्या मराठी माणसाची तुम्हाला माफी मागायला हवी” असे रितेशने सुनावले आणि त्यानंतर निक्कीने हात जोडून सर्वांची माफी मागितली. यामुळे तिला रडूही आले. त्यानंतर घरात जाऊन तिने पुन्हा एकदा वर्षाताईंची व इतर स्पर्धकांची वैयक्तिकपाने माफी मागितली.

आणखी वाचा – 04 August Horoscope : मेष, मिथुन, सिंह राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस आहे खूपच खास, नियोजित कामे होतील पूर्ण, जाणून घ्या…

दरम्यान, या भागात रितेशने घरातील इतर स्पर्धकांचाही चांगलंच पाणउतरा केला. रितेशने अंकिता प्रभू वालावलकरला ‘मराठी कार्ड’ वापरत असण्यावरुन झापले. इरिनाच्या जागी एका मराठी माणसाला स्थान मिळाले असते, या अंकिताच्या मुद्द्यावरुनही रितेशने तिला सुनावले. यानंतर त्याने पुरुषोत्तम दादा पाटील यांना ‘मिस्टर इंडिया’ म्हटले, तर योगिताला ‘मिसिंग इंडिया’ म्हटले. तसंच ‘बिग बॉस’च्या घरात एक प्रेक्षक म्हणून सगळं खेळ बघत असल्याचा टोमणा त्याने पॅडी कांबळेंना लगावला. जान्हवी आणि आर्याच्या कॅट फाइटवरुनही रितेशने दोघींनाही सुनावले. हात उचलला गेला तर घराबाहेर काढले जाईल असा इशाराच त्याने दिला. 

Tags: bigg boss marathi 5nikki tambolivarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 actress Surekha Kudachi special post on Varsha Usgaonkar

Bigg Boss Marathi 5 : "एक काळ इंडस्ट्री गाजवलेली..." सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची वर्षाताईंसाठी खास पोस्ट, म्हणाली, "लाज वाटते..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.