Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा नववा आठवडा सुरु झाला आहे. गेले आठ आठवडे हे पर्व विशेष गाजताना दिसतंय. यंदाच्या या नव्या पर्वाने धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. यंदाच्या या पर्वात वाईल्ड कार्ड स्पर्धक धरुन तब्बल १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यंदाच्या या पर्वाचे आता फार कमी दिवस शिल्लक आहेत. कालच ‘बिग बॉस’ यांनी एक मोठी घोषणा करत साऱ्या स्पर्धकांसह प्रेक्षकांना खूप मोठा धक्का दिला. यंदाचं हे पर्व १०० दिवसांचं नसून केवळ ७० दिवसांचं असणार आहे आणि या पर्वाचे आता शेवटचे १४ दिवस उरले आहेत. दरम्यान कमी दिवसांत आता ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांची टीम फुटली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला दोन टीम पाहायला मिळाल्या. मात्र आता या दोन्ही टीममध्येही वाद होऊन टीम फुटली असल्याचं दिसत आहे. अरबाजही घराबाहेर पडल्यानंतर आता निक्की एकटी पडली असल्याचं दिसत आहे. त्यानंतर निक्की आता अभिजीतशी संवाद साधायला आली असल्याचं दिसत आहे. निक्की व अभिजीत हे अंकिता बाबत गॉसिप करतानाही दिसत आहेत. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi १०० नव्हे तर ७० दिवसांचा असणार, शोकडून मोठी घोषणा, सगळ्यांनाच नॉमिनेट केलं अन्…
या प्रोमोमध्ये, निक्की अभिजीतला म्हणते, “मला एक पॉईंट क्लिअर करायचा आहे. रागात ती म्हणते तुझ्याकडे एकदा अरबाज आहे आणि एकदा अभिजीत आहे”. यावर अभिजीत बोलतो, “सगळे सगळ्यांशी बोलतात. अंकिता अरबाजशी किती बोलायची. जान्हवीबरोबर डीपी दादा बोलतात. डीपी दादा अरबाजशी बोलले आहेत. पॅडी दादा अरबाजशी किती चांगलं बोलायचा. फक्त आपण दोघे बोललो की त्यांना प्रॉब्लेम असतो”. यावर निक्की म्हणते, “सगळ्यांनी एकमेकांशी बोलायलाच हवं. कारण हे एक घर आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की व अभिजीतमध्ये जोरदार भांडण, दोघांनीही मैत्री तोडली, पण नेमकं झालं तरी काय?
निक्की अभिजीतला असंही विचारते की, “जस माझ्या प्रवासात मला अरबाजने २००% साथ दिली आहे. तुला काय वाटत तुझ्या प्रवासात तुला अंकिताने सपोर्ट केला आहे का?”. यावर अभिजीत नाही असं म्हणतो. अभिजीत म्हणतो, “नाही. उलट तिने माझ्यावर संशयच घेतला आहे. मी त्या दिवशी तेच पाहिलं. पत्रकार परिषदेत मी सगळ्यांमध्ये माझा माणूस शोधला पण सगळ्यांनी आपापला माणूस शोधला आणि मी एकटा पडलो”.