रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

यालाच म्हणतात संस्कार!, चप्पल काढत सूरजच्या कुटुंबियांची घरात एन्ट्री, Bigg Boss च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही की…

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 27, 2024 | 3:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Suraj Chavan sister and family take off their slippers after enter the house

Bigg Boss Marathi 5 घरात प्रवेश करताच सूरजच्या आत्या व बहीणींनी त्यांच्या पायातील चप्पल काढली आहे आणि त्यांची ही कृती सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरत आहे.

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन यावर्षी १०० दिवसांऐवजी फक्त ७० दिवसातच संपणार आहे. त्यामुळे शोमध्ये अनेक टास्क अनेक ट्विस्टदेखील कमी झालेत. सीझन संपायला काही दिवस बाकी असल्याने घरात नुकताच  फॅमिली स्पेशल भाग होत आहे. यामुळे घरातील सदस्यांबरोबर प्रेक्षकांचीही इच्छा पूर्ण झाली आहे. अखेर सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी घरात येणार आहेत. गुरुवारच्या भागात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिजीत, वर्षा, जान्हवी व डीपी यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना पाहून घरातील सर्वच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan Family)

अशातच आजच्या भागात उर्वरीत सदस्यांच्या घरातील मंडळी ‘बिग बॉस’च्या घरात येणार आहेत. यामध्ये अंकिता, सूरज, पॅडी व निक्की यांच्या सदस्यांचा समावेश आहे. यापैकी सूरजच्या कुटुंबियांचा आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश होणार आहे. सूरजला भेटण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात त्याची बहीण व आत्या यांचा समावेश आहे. कलर्स मराठीने सूरजच्या कुटुंबियांच्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवेशाचा भावुक व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss च्या घरात सूरजला भेटायला आल्या बहिणी व आत्या, ‘ते’ दृश्य पाहून सगळ्यांनाच अश्रू अनावर, निक्कीने तर मिठी मारली अन्…

सूरजच्या आत्या व बहिणींनी या घरात प्रवेश करताच त्यांच्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच सूरजच्या आत्या व बहीणींनी त्यांच्या पायातील चप्पल काढली आहे आणि त्यांची ही कृती सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरत आहे. याआधी सूरजनेदेखील अशा छोट्या कृतींमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. अशातच त्यांच्या कुटुंबियांची ही साधी व सोपी कृती सर्वांचे सर्वांचे लक्ष वेधत आहे. या प्रोमोमध्ये आपल्या आत्या व बहिणींना पाहून सूरजला अश्रु अनावर झाले आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “माझा साखरपुडा झालाच नाही”, निक्कीच्या आईच्या आरोपांवर अरबाज पटेलचं स्पष्टीकरण, म्हणाला, “तिची समजूत काढेन आणि…”

अभिजीत, वर्षा व डीपी यांच्या कुटुंबीयांना पाहून सूरज त्याच्या घरातील सदस्यांची आतुरतेने वाट पाहताना दिसला होता. मात्र आता ही उत्सुकता संपली आहे. सूरजच्या घरच्यांनी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. दरम्यान, या व्हिडीओला प्रेक्षकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी त्यांची इच्छा पूर्ण झाली असल्याचे कमेंट्समध्ये म्हटलं आहे.      

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 New PromoSuraj Chavan sister and family
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Sydney Sweeney To Launch Soap 
Lifestyle

ऐकावं ते नवलंच! स्वतःच्या अंघोळीच्या पाण्याने साबण बनवून विकते प्रसिद्ध अभिनेत्री, किंमत ऐकून सगळ्यांनाच बसला मोठा धक्का

मे 31, 2025 | 2:00 pm
ashok saraf padma shri
Entertainment

“माझा अपघात झाला तेव्हा…”, पद्मश्री प्राप्त झाल्यानंतर अशोक सराफांचा कठीण काळाबाबत खुलासा, म्हणाले, “लोकांनी तर…”

मे 31, 2025 | 12:57 pm
Next Post
actress rakshanda khan

'क्योंकी सास भी…', मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, अभिनयक्षेत्रात नाव कमावल्यानंतर आता नेमकं करते तरी काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.