Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धक मंडळी तुफान राडे करताना दिसत आहेत. भाऊचा धक्का झाल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घरातील सगळीच चित्रे बदलली आहेत. रितेश देशमुख यांनी त्यांच्या चक्रव्ह्यूह मध्ये स्पर्धकांची पोलखोल केली आहे. तेव्हापासून घरात नेमकं काय सुरु आहे हे कळेना झालं आहे. कोण कोणाच्या टीममध्ये आहे हे कळणं कठीण झालं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीने तिच्या टीम ए मधून एक्झिट घेतली असून सध्या ती इतर स्पर्धकांसह संवाद करताना दिसत आहे. निक्की व अभिजीत यांच्यातील मैत्री पाहता निक्की बराच वेळ अभिजीतबरोबर घालवते.
अशातच ‘बिग बॉस’ यांनी दिलेल्या नव्या टास्कमध्ये निक्की व अभिजीत यांची जोडी पाहायला मिळतं आहे. अभिजीतचा टीम बीने विश्वासघात केला असल्याचं त्याला वाटत असून तो देखील त्याच्या टीममधील स्पर्धकांवर नाराज आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये पॅडी दादा, अभिजीत, निक्की, एकत्र बसून बोलताना दिसत आहेत. पॅडी दादा अभिजीत बरोबर बोलायला आलेले दिसत आहेत. मात्र अभिजीतच्या मनात अजूनही त्यांच्याबद्दलचा राग दिसत आहे.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : आदित्य-प्रीतममध्ये दुरावा, प्रियाबरोबरच नात समोर आलं आणि…; मालिकेत मोठा ट्विस्ट
पॅडी दादा अभिजीतसह चर्चा करताना असं बोलतात की, “तुला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर जर निक्की व अरबाजसारखी तुझ्यावर वेळ आली तर तू मला कॅप्टन्सी देशील”. यावर निक्की हसते आणि टाळ्या वाजवत म्हणते, “नाही नाही आता तर मी हक्काने बोलणार”. त्यावर अभिजीत पॅडी दादांना बोलतो, “तुम्ही हे समजा की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे”. यावर पॅडी म्हणतात, “हे तू पहिल्या आठवड्यात दाखवून दिल आहेस”. यावर अभिजीत म्हणतो, “पण तुम्ही आता तसे राहिला नाहीत आहात”. यावर पॅडी म्हणतात, “ज्या गोष्टी घडत होत्या त्यावर आता प्रतिक्रिया मिळत आहेत, बाकी काही नाही”.
यावर अभिजीत म्हणतो, “एखाद्या माणसाला तुम्हाला त्रास द्यायचा असतो तो त्रास तुम्ही दिला. संपलं आता”. यावर पॅडी म्हणतात, “त्रास कसला. त्रास नव्हता हे सगळं गमतीत सुरु होत जसं तू गमतीत बोलायचं अगदी तसं”. यावर अभिजीत निक्कीकडे हात दाखवत म्हणतो, “आता तुम्ही हिला त्रास देत आहात. आम्हाला दोघांना टार्गेट केलं जात आहे”. यावर पॅडी म्हणतात, “आपण जे वागलेलो असतो तेच आपल्याला परत मिळतं”.