Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला अगदी दणक्यात सुरुवात झाली. या नवीन पर्वाची सुरुवातच भांडणांनी व वादांनी झाली. निक्की व वर्षाताईंमधली भांडणं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. यानंतर रितेशने निक्कीला सुनावत तिची माफीही मागायला लावली. मात्र घरात पहिल्या दिवसापासून स्पर्धकांमध्ये वादावादी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकामागून एक स्पर्धक वाद घालत आहेत. निक्की-वर्षा, आर्या-जान्हवी यांच्या भांडणांनंतर आता घरात नवीन वाद होणार आहे आणि हा नवीन वाद म्हणजे घन:श्याम दरवडेचं. नुकत्याच आलेल्या एका नवीन प्रोमोमध्ये छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडे व अंकिता वालावलकर यांच्यात काही कारणावरुन वाद झाला आहे. (Bigg Boss Marathi Daily Update)
कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात घन:श्याम व अंकिता यांच्यात वाद होतानाचे पाहायला मिळत आहे. काही कारणावरुन अंकिताला घन:श्यामचा राग आला असून हा राग ती डिपी दादाकडे व्यक्त करत आहे. यावेळी तिने मला घन:श्यामला मारावस वाटतं आहे” असं म्हणते. यापुढे ती “त्याच्या एका शब्दावर मला विश्वास नाही. त्याला टुन टुन धावत येताना बघून मला असं वाटतं होतं की त्याच्या सटसट दोन कानाखाली माराव्यात”. तिच्या या बोलण्यावरुन दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचे दिसत आहे.
तसंच या प्रोमोमध्ये पॅडी व घन:श्याम यांच्यातही वाद झाल्याचे दिसूण येत आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीचे आगामी भाग फारच मनोरंजन असणार असल्याचे या प्रोमोवरुन दिसून येत आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील अनेक वादांमध्ये आता या वादाची ठिणगी पडली आहे. घन:श्याम व अंकिता तसंच घन:श्याम व पॅडी यांच्यातील हे वाद नक्की कशावरुन होणार आहेत हे अजून कळलं नाही. त्यामुळे या नवीन भागासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात पॅडी म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांनी निक्कीच्या कपड्यांच्या कंटेनरला हात लावला. यामुळे आपल्या खाजगी वस्तूंना हात लावल्याच्या रागात निक्कीने घरातील सर्वांच्या वस्तूंची नासधूस केली. यामुळे निक्कीने घरात खूपच कल्ला केला. यामुळे घरातील ज्या ज्या सदस्यांचे सामान निक्कीने फेकले होते. त्या त्या सदस्यांमध्ये खूपच राडा झाला.