शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अन् ‘बिग बॉस मराठी’च्या घरातले सगळेच सदस्य रडू लागले, पण नेमकं झालं काय? पाहा हा भावुक प्रोमो

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 15, 2024 | 11:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Abhieet Sawant, Pandharinath Kamble, Janhvi Killekar, Dhananjay Powar, Ankita Walawalkar, Suraj Chavan emotional.

Bigg Boss Marathi 5 च्या नवीन प्रोमोमध्ये अभिजीत, पंढरीनाथ, जान्हवी, धनंजय, अंकिता, सूरज चव्हाणसह सर्वच सदस्य भावूक

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ हा एक असा शो आहे, जिथे सर्व भांडतात, वाद घालतात. पण अनेकदा ही मंडळी भावुकही होतात. असाच स्पर्धकांचा एक भावुक व्हिडीओ कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख ‘मी सगळ्या सदस्यांना खूप मोठं सरप्राइज देणार आहे’ असं म्हणत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करतो. त्याला पाहताच सर्व सदस्य आनंदित होतात आणि त्याची गळाभेट घेतात. यानंतर रितेश “तुमच्यासाठी मी घरच इकडे आणतोय” असं म्हणतो. त्यामुळे या नवीन प्रोमोद्वारे स्पर्धकांची त्यांच्या घरच्यांशी भेट घडणार असल्याचे या प्रोमोमधून दिसत आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)

या प्रोमोमध्ये अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण असे सर्वच सदस्य भावूक झालेले पाहायला मिळत आहे. या सदस्यांना रितेश देशमुख त्यांना धीर देत आहे. या प्रोमोमध्ये काही स्पर्धक आपल्या मुलांना बघून भावुक झाले आहेत तर काही आपल्या आई-वडिलांना बघून भावुक झाले आहेत. त्यामुळे एकंदरीच स्पर्धक आपल्या घरच्यांशी संवाद साधणार असल्याचे या नवीन प्रोमोमधून दिसत आहे. त्यामुळे आता हे स्पर्धक आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यामध्ये नक्की काय बोलणे होणार? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. तसंच रितेश घरात आल्यानंतर स्पर्धक आणि त्याच्यामध्ये काय संवाद होणार? हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – “सगळं संपल्याची जाणीव झाली आणि…”, ‘ठिपक्यांची रंगोळी’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याला झाला होता ब्रेन हॅमरेज, म्हणाला, “बरा झालो पण…”

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धकांची जितकी चर्चा होते, तितकीच चर्चा या सीझनचे सूत्रसंचालन करणाऱ्या रितेश देशमुखचीही होताना दिसते. त्यामुळे प्रेक्षक भाऊच्या धक्क्याची आतुरतेने वाट पाहत असतात. भाऊचा धक्कामध्ये रितेश देशमुख चुकलेल्या स्पर्धकांची ‘शाळा’ घेतो आणि बरोबर खेळणाऱ्या सदस्यांना शाबासकी देतो. तसंच प्रत्येक एपिसोडमध्ये तो धक्का काही अनपेक्षित धक्केदेखील देतो. असाच एक भावुक धक्का आज रितेश सर्वांना देणार आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मी तिच्या पाठीशी…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या आर्याला पाठींबा, म्हणाला, “ती चुकीची होती पण निक्की…”

दरम्यान, या आठवड्यात आर्या व निक्की तांबोळी यांच्यामध्ये मोठे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. या भांडणात आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली होती. त्यामुळे सुरुवातीला तिला जेलमध्ये टाकण्याची शिक्षा देण्यात आली; मात्र अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर होईल, असं म्हटलं गेलं आणि त्यानुसार भाऊच्या धक्क्यावर आर्याला तिच्या या कृत्यासाठी घराबाहेर जाण्याची शिक्षा दिली गेली.

Tags: Abhieet SawantPandharinath KambleSuraj Chavan emotional
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Paddy Kamble emotional actress Vishakha Subhedar shared memory

Bigg Boss Marathi च्या घरात पॅडीला भावुक झालेला पाहून सहअभिनेत्रीने सांगितला जुना किस्सा, म्हणाली, “आम्ही प्रयोगाला जात होतो तेव्हा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.