Bigg Boss Marathi 5 : सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस मराठी’चे यंदाचे पर्व हे चांगलेच सुपरहिट ठरत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पडला. यावेळी रितेश देशमुखने सर्व सदस्यांची चांगलीच कानउघडणी केली. तर दुसरीकडे आता ‘बिग बॉस मराठी’ने प्रेक्षकांना आणखी एक धक्का दिला आहे. तो म्हणजे या घरातील एलिमिनेशनचा. या घरात आज एलिमिनेशन होणार असून या घरातून प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडणार आहे. (Bigg Boss Marathi 5 Ankita Prabhu Walawalkar Exit)
बिग बॉसच्या घरात दर रविवारी एक सदस्य बाहेर पडतो आणि बिग बॉसच्या पाचव्या आठडव्यात घरातून अंकिता बाहेर पडली आहे. नुकतंच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरचा ‘बिग बॉस मराठी’मधला प्रवास संपल्याचे दिसत आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला रितेश देशमुख हा या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे अंकिता असे सांगतो. रितेशने अंकिताचे नाव घेतल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर अंकिता उठून तिच्या नावाची पाटी घेते आणि सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे.
रितेशने अंकिताचा प्रवास संपल्याचे जाहीर करताचं धनंजय पवार आणि सूरजला अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहेत. बिग बॉस मराठीच्या घरावर कोकणाच्या चेडवाचा राज पाहायला मिळाला. पण अंकिता प्रभू-वालावलकरचा ‘बिग बॉस मराठी’मधला प्रवास आता संपला आहे. अंकिता आता अचानक घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये या आठवड्यात वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी आणि अंकिता वालावलकर हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. मात्र या घरातून कोण बाहेर जाणार? यांची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. या आठवड्यात ती घराबाहेर पडेल असे कोणालाही वाटले नव्हते. अशातच आता या घरातून अंकित बाहेर पडली आहे. त्यामुळे सर्वानाच मोठा धक्का बसला आहे.