शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 : वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळीच्या भांडणावर किशोरी शहाणेंनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या, “आदर न देता…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 3, 2024 | 6:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 Kishori Shahane talked on varsha usgaonkar and nikki tamboli fight

Bigg Boss Marathi 5 मधील वर्षा-निक्कीच्या भांडणावर किशोरी शहाणेंची स्पष्ट भूमिका

Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाची जोरदार सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासून घरात एकमेकांचे वाद होत आहेत. वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांच्यातील वाद तर थांबायचं नावचं घेतं नाहीत. या घरात निक्की वर्षा उसगांवकरांचा सतत अपमान करताना दिसत आहे. अनेक मराठी कलाकारांनी, नेटकऱ्यांनी व वर्षा यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे निक्की विरोधात आवाज उठवला आहे. तिचं वर्षाताईंबरोबरचे वागणं आवडत नाही. अशातच अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांच्यातील वादावर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. यावेळी त्यांनी तरुण मुलांकडून आमच्या सारख्यांना डावललं जात असल्याचे सांगितलं. (Kishori Shahane On Varsha Usgaonkar)

किशोरी शहाणे यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात ‘‘बिग बॉस मराठी’च्या नुकत्याच सुरु झालेल्या पर्वाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी किशोरी यांना वर्षा उसगांवकरांबद्दल विचारण्यात आले. याचे उत्तर देत किशोरी यांनी असं म्हटलं की, “यावेळचं ‘बिग बॉस’ हे खूपच सुंदर आहे असं मला वाटतं. खूप चांगले स्पर्धक यंदा घरात पाहायला मिळत आहे. पहिला भाग बघितल्यानंतर मला खूपच मज्जा आल. नंतरचे भाग मी पाहिले नाहीत. पण मी बघायचा प्रयत्न करत आहे आणि वर्षाला तोच प्रॉब्लेम होत आहे, जो मला झाला होता. तो म्हणजे यंगस्टर्स (तरुण मुलं-मुली) ते आपल्याला डावलतात. आदर न देता मागे खेचण्याचा प्रयत्न करतात”.

आणखी वाचा – ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री कधीच होऊ शकणार नाही आई, दु:ख व्यक्त करत सांगितले कारण, म्हणाली, “सर्व प्रयत्न केले पण…”

यापुढे त्या असं म्हणाल्या की, “पण वर्षाने माझा खेळ पाहिला असेल तर ती यातून उभी राहील. तिने माझा खेळ पाहिला आहे आणि ‘बिग बॉस’बद्दल आमच्या खूप गप्पाही झाल्या आहेत. त्यामुळे ती तिथली परिस्थिती उत्तमपणे सांभाळेल असं मला वाटतं”. यापुढे त्यांनी त्यांच्या ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवासाबद्दल असं म्हटलं की, “‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण हे खूपच ताणावाचं होतं. मी खूप टेंशनमध्ये होते. कारण ते आत्मविश्वास खाली आणतात. तुम्हाला एकटं पाडतात आणि तो त्यांचा खेळ असतो. म्हणजे तुम्ही इतकं नाराज व्हायला पाहिजे की तुम्ही घरातून बाहेरचं पडलं पाहिजे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : निक्की तांबोळीचा पत्ता कट?, रितेश देशमुखचा राग अनावर, माफीही मागायला लावली अन्…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात निक्की व वर्षा यांच्यात आल्यापासून चांगलीच जुंपली आहे. या घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासूनचं त्यांच्यातील भांडणं पाहायला मिळाली. या भांडणात तिने अनेकदा वर्षाताईंचा अपमान केला. यावर आता रितेश काय भूमिका घेणार? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आजच्या भाऊचा धक्का या विशेष भागासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Tags: bigg boss marathi 5kishori shahanevarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
04 august 2024 Saturday daily horoscope marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

04 August Horoscope : मेष, मिथुन, सिंह राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस आहे खूपच खास, नियोजित कामे होतील पूर्ण, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.