बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Update : हिंदी ‘बिग बॉस’ ६ ऑक्टोबरला सुरु होणार, १०० दिवसांच्या आतच ‘बिग बॉस मराठी’ संपणार?, नक्की सत्य काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 23, 2024 | 11:54 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
riteish deshmukh vs salman khan

हिंदी 'बिग बॉस' मुळे मराठी 'बिग बॉस' संपणार? नेमकं सत्य काय?

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ हा रिऍलिटी शो वादग्रस्त शोपैकी एक आहे. आजवर या शोने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मग हा शो हिंदीमध्ये असो वा मराठीमध्ये वा अन्य कोणत्याही भाषेत या शोची रूपरेषाच प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवते. सध्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ ची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. या नव्या पर्वाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सर्व स्पर्धक त्यांच्या कृतीने लक्ष वेधून घेत आहेत. रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनाची स्टाईल देखील सर्वांना आवडते. यंदाच्या या नव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची तयारी रितेश देशमुखने उत्तमरीत्या सांभाळली आहे. आता या लोकप्रिय शोबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लवकर हा सुपरहिट शो संपणार आहे.

‘बिग बॉस मराठी ५’ चा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे आणि याच दिवशी सलमान खानच्या ‘बिग बॉस १८’च्या प्रीमियरचा दिवस असणार आहे. ‘बिग बॉस तक’वरील पोस्टनुसार, ‘बिग बॉस मराठी ५’ या शोला चांगले टीआरपी रेटिंग मिळूनही हा शो ७० दिवसांत संपवण्याचा निर्णय घेतला आहे. एक्स पोस्टमध्ये लिहिले होते, “बिग बॉस मराठी लवकरच संपणार आहे! निर्माते ६ ऑक्टोबर रोजी ग्रँड फिनालेचे नियोजन करत आहेत. शो इतका अचानक का संपत आहे? त्याची सुरुवात ब्लॉकबस्टर रेटिंग आणि टीआरपीने झाली, मग काय चूक झाली?”, असे प्रश्न आता भंडावून सोडत आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi घेणार एक मोठा निर्णय, महत्त्वाची घोषणा करताच सदस्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडणार, नेमकं काय झालं?

मात्र हे असे करण्यामागचे एक कारण असे असू शकते असा अंदाज अनेकांनी बांधला आहे. हा शो संपण्याचे कारण म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५. सलमान खानचा ‘बिग बॉस १८’ ऑक्टोबर ६, २०२४ ला लाँच केला जाईल. अहवाल सूचित करतात की, निर्मात्यांनी मराठी बिग बॉस आणि बिग बॉस १८ मधील दर्शकांचा संघर्ष टाळण्यासाठी ‘बिग बॉस मराठी ५’ संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “निक्की जायला हवी होती”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच वक्तव्य, म्हणाली, “तिच्या नादाला लागून तो…”

निर्मात्यांनी अलीकडेच ‘बिग बॉस १८’चा पहिला प्रोमो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. यावरुन लवकरच सलमान खान ‘टाइम का तांडव’ घेऊन येणार आहे.सध्या, बिग बॉस मराठी ५ मध्येही स्पर्धक अखेरच्या टप्प्यात धुमाकूळ धुमाकूळ आहेत. आणि रितेश देशमुखने होस्ट केलेल्या शोचे अंतिम स्पर्धक कोण असतील याकडे डोळे लावून बसले आहेत.

Tags: Bigg Boss 18bigg boss marathi 5bigg boss reality show
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Apurva Nemlekar Father and Brother Emotional Post

आधी वडील नंतर भावाचं झालं होतं निधन, अपूर्वा नेमळेकर एकटीच पडली, म्हणाली, "थोडा वेळ रडून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.