Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ हा रिऍलिटी शो वादग्रस्त शोपैकी एक आहे. आजवर या शोने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मग हा शो हिंदीमध्ये असो वा मराठीमध्ये वा अन्य कोणत्याही भाषेत या शोची रूपरेषाच प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवते. सध्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ ची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. या नव्या पर्वाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सर्व स्पर्धक त्यांच्या कृतीने लक्ष वेधून घेत आहेत. रितेश देशमुखच्या सूत्रसंचालनाची स्टाईल देखील सर्वांना आवडते. यंदाच्या या नव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची तयारी रितेश देशमुखने उत्तमरीत्या सांभाळली आहे. आता या लोकप्रिय शोबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लवकर हा सुपरहिट शो संपणार आहे.
‘बिग बॉस मराठी ५’ चा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे आणि याच दिवशी सलमान खानच्या ‘बिग बॉस १८’च्या प्रीमियरचा दिवस असणार आहे. ‘बिग बॉस तक’वरील पोस्टनुसार, ‘बिग बॉस मराठी ५’ या शोला चांगले टीआरपी रेटिंग मिळूनही हा शो ७० दिवसांत संपवण्याचा निर्णय घेतला आहे. एक्स पोस्टमध्ये लिहिले होते, “बिग बॉस मराठी लवकरच संपणार आहे! निर्माते ६ ऑक्टोबर रोजी ग्रँड फिनालेचे नियोजन करत आहेत. शो इतका अचानक का संपत आहे? त्याची सुरुवात ब्लॉकबस्टर रेटिंग आणि टीआरपीने झाली, मग काय चूक झाली?”, असे प्रश्न आता भंडावून सोडत आहेत.
मात्र हे असे करण्यामागचे एक कारण असे असू शकते असा अंदाज अनेकांनी बांधला आहे. हा शो संपण्याचे कारण म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५. सलमान खानचा ‘बिग बॉस १८’ ऑक्टोबर ६, २०२४ ला लाँच केला जाईल. अहवाल सूचित करतात की, निर्मात्यांनी मराठी बिग बॉस आणि बिग बॉस १८ मधील दर्शकांचा संघर्ष टाळण्यासाठी ‘बिग बॉस मराठी ५’ संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
निर्मात्यांनी अलीकडेच ‘बिग बॉस १८’चा पहिला प्रोमो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. यावरुन लवकरच सलमान खान ‘टाइम का तांडव’ घेऊन येणार आहे.सध्या, बिग बॉस मराठी ५ मध्येही स्पर्धक अखेरच्या टप्प्यात धुमाकूळ धुमाकूळ आहेत. आणि रितेश देशमुखने होस्ट केलेल्या शोचे अंतिम स्पर्धक कोण असतील याकडे डोळे लावून बसले आहेत.