‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात नेहमीच चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे सूरज चव्हाण. सूरज चव्हाणने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला तेव्हापासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सोशल मिडियावर तर सूरजला भरभरुन पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. सूरजने त्याच्या साध्या व समजूतदार शैलीने प्रेक्षकांची मन जिंकली. ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेतलेल्या सर्वच स्पर्धकांनी सूरजच कौतुक केलेलं पाहायला मिळालं. काहींनी तर सूरजच विजेता होणार अशी घोषणा केली. आता नुकताच एलिमिनेट झालेला वैभव चव्हाणनेही सूरजबाबत आणि सूरजच्या मैत्रीबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. (Vaibhav Chavan on friendship with Suraj Chavan)
सूरज व वैभव हे विरुद्ध टीममधून खेळत होते तरी ते ‘बिग बॉस’च्या घरात येण्याआधीपासून मित्र होते. सूरज हा सर्वच स्पर्धकांचा आवडता आहे. ‘बिग बॉस’च्या घरातही सूरजवर सगळेच भरभरुन प्रेम करतात. प्रत्येकजण त्याला समजून घेत खेळताना दिसतात. आता ‘बिग बॉस’मधून एक्झिट घेतल्यानंतर वैभव चव्हाणने नुकतीच इट्स मज्जाला मुलखात दिली. यावेळी सूरजची घरातील वागणूक आणि त्याच्याबरोबरची मैत्री याबाबत वैभवला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा वैभव म्हणाला, “सूरजला मी आधीही भेटलो आहे. त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनलाही मी जायचो. त्याची व माझी मैत्री आधीपासूनच आहे. त्याचं आणि माझं गाव शेजारीच आहे हे बऱ्याच लोकांना माहितही नाही”.
आणखी वाचा – ‘साडे माडे ३’च्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात, रिंकू राजगुरुचीही एन्ट्री, काय असणार नवीन?
दोघेही एकाच गावातील असल्याचा खुलासा करत सूरज म्हणाला, “आम्ही दोघंही बारामतीचे आहोत. घरात गेल्यानंतरही पहिली मिठी मी सूरजलाच मारली. सूरज म्हणजे माझ्या हक्काचा माणूस आहे. मी त्याच्याशी जे काही भांडलो ते लोकांनी बहुदा वेगळ्या पद्धतीने घेतलं असेल. माझ्या मनात त्याच्याबाबत काही वाईट नाही. त्याच्या मनातही माझ्याविषयी काही वाईट नाही. जेवढा तो घरात साधा आहे बाहेरही तो अगदी तसाच आहे. मीही सूरजबरोबर उभं राहण्याचा प्रयत्न केला. पण घरात ग्रुप असल्यामुळे काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडल्या”.
शेवटी वैभव असे म्हणाला की, “घरातून बाहेर येतानाही मी त्याला मिठी मारली. तेव्हा मी त्याला हे म्हटलं की, ट्रॉफी बारामतीमध्येच आली पाहिजे. माझा त्याला पाठिंबा आहे. आता घराबाहेर आल्यानंतरही तसंच असणार. त्याच्याबरोबर माझं कौटुंबिक नातं आहे. जर तो ट्रॉफी जिंकणार असेल तर मी स्वतः त्याला इकडे घ्यायला येईन”.