रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ट्रॅक्टर चालवला, शेतामध्ये फिरली अन्…; सूरज चव्हाणने जान्हवीला दाखवलं त्याचं संपूर्ण गाव, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 6, 2024 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Janhavi Killekar went to Suraj Chavan village and she drove a tractor in the farm video shared on Social Media.

जान्हवी किल्लेकर पोहोचली सूरजच्या गावी, शेतात ट्रॅक्टर चालवला अन्...; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘बिग बॉस’च्या शो संपल्यानंतर सगळ्यांचा आपापला प्रवास सुरु होतो. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो. असं असलं तरी ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर त्यांची मैत्री जपताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन जिंकणारा सूरज चव्हाण हा तसा सर्वांचाच लाडका. या शोनिमित्ताने त्याचे अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध झाले. पॅडी, अंकिता, डीपी, निक्की यांच्यासह त्याचं जान्हवीबरोबरही खूप जमलं. अशातच नुकतंच तिने सूरजच्या गावी जात भाऊबीज साजरी केली. काही दिवसांपूर्वीच जान्हवीने सूरजच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली होती. त्यानंतर आता दिवाळीत, भाऊबीजेच्या निमित्ताने ती पुन्हा त्याच्या घरी पोहोचली. (Janhavi Killekar Went Suraj Chavan Village)

यावेळी जान्हवीने सूरजची भेट घेत त्याच्या शेतातही फेरफटका मारला. दोघांचा शेतातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूरज व जान्हवी या दोघांनी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात जान्हवी सूरजच्या शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. गुलाबी ड्रेस घालून जान्हवी किल्लेकर सूरजच्या शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. सूरज व जान्हवी शेतात धम्माल करताना दिसत आहेत. सूरजदेखील भाऊबीजेसाठी कुर्ता व पायजमा घालून खास तयार झाल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

आणखी वाचा – Sharda Sinha Passed Away : सुप्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूशी झुंज अपयशी

“रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील का?” या खास गाण्यावर दोघांनी हा रील व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. “जान्हवी खरंच खूप प्रेमळ आहे”, “छान व्हिडीओ”, “टॉप क्लास”, “सुंदर जोडी”, कडक”, “ “दोघांची जोडी भारी आणि अशी राहूदे कायमस्वरूपी” या आणि अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.  

आणखी वाचा – 05 November Horoscope : वृषभ, मिथुन व तूळ राशीच्या लोकांना बुधवारी नोकरी आणि व्यवसायात होणार नफा, जाणून घ्या…

दरम्यान, भाऊबीजेनिमित्त जान्हवी किल्लेकर तिचा लेक, पती किरण किल्लेकर् यांच्याबरोबर गेली होती. यावेळी जान्हवीने लाडक्या भावाला मिठी मारत त्याची भेट घेतली तसेच त्याची विचारपूसदेखील केली. भाऊबीजेसाठी नक्की गावी येईन असा शब्द जान्हवीने सूरजला दिला होता आणि तिने हा शब्द खरा करून दाखवला आहे. 

Tags: Janhavi Killekar and Suraj Chavan MeetJanhavi Killekar Suraj Chavan Villagemarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Sydney Sweeney To Launch Soap 
Lifestyle

ऐकावं ते नवलंच! स्वतःच्या अंघोळीच्या पाण्याने साबण बनवून विकते प्रसिद्ध अभिनेत्री, किंमत ऐकून सगळ्यांनाच बसला मोठा धक्का

मे 31, 2025 | 2:00 pm
ashok saraf padma shri
Entertainment

“माझा अपघात झाला तेव्हा…”, पद्मश्री प्राप्त झाल्यानंतर अशोक सराफांचा कठीण काळाबाबत खुलासा, म्हणाले, “लोकांनी तर…”

मे 31, 2025 | 12:57 pm
Next Post
Meenal Shah New Home

'बिग बॉस मराठी' फेम या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने थेट गोव्यात उभारला आलिशान बंगला, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.