गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“खरा वागलो तरी एकटाच पडलो आणि…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, “ज्यांनी खरे रंग दाखवले…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 8, 2024 | 6:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pushkar Jog viral Post

अभिनेता पुष्कर जोगची लक्षवेधी पोस्ट, नेमकं प्रकरण काय?, पोस्ट शेअर करत स्वतःला दिली प्रेरणा

सिनेमाविश्वात असे बरेच कलाकार आहेत जे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत असतात. बरेचदा ही कलाकर मंडळी न पटणाऱ्या मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केल्याने व पोस्ट शेअर केल्याने चर्चेत येतात. तर काही कलाकार मंडळी अशी आहेत जे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचे अनेक अपडेटही सोशल मीडियावरुन पोस्ट करताना दिसतात. यापैकीच एक अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. पुष्करने बरेचदा न पटणाऱ्या व विविध अंगी विषयावर भाष्य करत त्याचं मत मांडलं आहे. सोशल मीडियावर पुष्करचा बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. सोशल मीडियाद्वारे तो नेहमीच काही ना काही ना काही पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. (Pushkar Jog Post)

अशातच पुष्करने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पुष्करने ही पोस्ट शेअर केल्याने साऱ्यांच्या नजरा त्याच्या पोस्टकडे लागून राहिल्या आहेत. वैयक्तिक आयुष्यात आलेले चढ-उतार, आलेले अनुभव, झालेली फसवणूक यामुळे त्रस्त असलेल्या पुष्करने ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या सगळ्या प्रकारामुळे पुष्कर थोडासा मेंटली स्थिर नव्हता अशावेळी त्याने देवाचे दर्शनही घेतले.

आणखी वाचा – Appi Amchi Collector : अखेर अप्पी-अर्जुन एकत्र येणार, प्रेमाची कबुली देत एकत्र राहण्याचा निणर्यही घेतला अन्…; मालिकेत मोठा ट्विस्ट

पुष्करने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, “सगळ्यांसाठी सगळं केलं, खरा वागलो. जेव्हा जेव्हा मेंटली खचतो तेव्हा तेव्हा मी आपले कोण कोण आहेत ते शोधतो. तर ते म्हणजे आई व मुलगी. नशीबवान आहेत सर्व ज्यांना खरे काळजी घेणारे मित्र आहेत. जिवंत असताना एकटाच राहीन बहुतेक. मी गेल्यावर कोणी कोणी यायचं त्याची लिस्ट मी देऊन जाईन. उगाचच किती वाईट वाटला याचा आव आणून येऊ नका. पण अजुन १२ वर्ष आहेत. राष्ट्रीय पुरस्कार, ऑस्कर माझ्या मराठी चित्रपटासाठी जिंकायचा आहे. Legend होऊनच जाईन. आई व फेलीशाला खूप प्रेम. ज्यांनी वेळोवेळी आपले खरे रंग दाखवले त्या सर्वांचे आभार”, त्याने असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीने छोटा पुढारीला किस केलं मिठीही मारली अन्…; घन:श्यामला काय करु नी काय नको सुचेना, व्हिडीओ व्हायरल

तर पुष्करने गोव्यातील मंगेशी मंदिरात दर्शन घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर त्याने, “परमेश्वरा मी थकतोय. एकटा लढतोय. खूप वापरुन घेतात. खूप फसवतात. मी जो पर्यंत जिंकत नाही तो पर्यंत कायम लढत राहीन”, असं कॅप्शन देत स्वतःला प्रेरणा दिली आहे.

Tags: marathi actorpushkar jogpushkar jog post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
09 august 2024 Saturday daily horoscope marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

09 August Horoscope : 'नागपंचमी'च्या दिवशी ‘या’ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार, नोकरी, व्यवसाय व शिक्षणात होणार फायदे

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.