महिलांना गाडी चालवता येत नाही, महिला चुकीचे इंडिकेटर देऊन गाडी चालवतात, त्यांना सिग्नल कळत नाहीत… अशा आशयाचे अनेक जोक्स व मीम सोशल मीडियावर अगदी सर्रास व्हायरल होतात आणि या मीम्स व जोक्सवर अनेकजण विनोद निर्मितीही करतात. समाजातील याच महिलांना कमी समजल्या जाणाऱ्या वाटणाऱ्या गोष्टींवर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने भाष्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘बिग बॉस मराठी ५’ फेम जान्हवी किल्लेकर. अभिनेत्री जान्हवी किल्लेकरही पूर्वी तिच्या मालिकांमुळे चर्चेत होती. पण ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये स्पर्धक म्हणून गेल्यापासून तिच्या प्रसिद्धीत वाढ झाली. ‘बिग बॉस मराठी ५’मधून चर्चेत आलेली जान्हवी सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते आणि सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. (Janhavi Killekar on women driving skills)
अशातच तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओद्वारे तिने समाजात महिलांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर भाष्य केलं आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, “आजचा हा व्हिडीओ बनवण्यामागचं कारण असं आहे की, लोक महिलांना काय समजतात काय माहिती. म्हणजे तुम्हाला असं काय वाटत की त्यांना काय अक्कल कमी आहे का? हा भेदभाव का आहे? महिलांना काय मत नाही किंवा आयुष्यात त्यांना काही गोष्टी कधी जमणारच नाहीत. हा भेदभाव का आहे हा आपल्या समाजात भेदभाव का आहे?”
यापुढे जान्हवीने असं म्हटलं आहे की, “त्याआधी मी कोणत्या विषयावर बोलते हे मी सांगते. महिलांना गाडी चालवता येत नाही. ठीक आहे १० ते २० टक्के लोकांना कदाचित गाडी चालवता येत नसेल. त्याची काही कारणेही असतील, त्या शिकत असतील किंवा त्यांना अंदाज येत नसेल. तबद्दल अनेक जोक आणि मीमसुद्धा सोशल मीडियावर येत असतात. मुलींना गाडी चालवता येत नाही आणि त्या चुकीचे सिग्नल देतात वगैरे वगैरे. हे जोक लोकांनी इतके मनावर घेतले आहेत की त्यांना खरच असं वाटत की महिलांना गाडी चालवता येत नाही”.
आणखी वाचा – “तिनेच दारुची सवय लावली”, प्रत्युषा बॅनर्जीच्या एक्स बॉयफ्रेंडचे काम्या पंजाबीवर धक्कादायक आरोप, काळं सत्य
यापुढे जान्हवीने तिच्याबद्दल घडलेला किस्सा सांगताना असं म्हटलं की, “रस्ता पूर्ण खोदलेला होता आणि एवढाच रस्ता शिल्लक होता की, त्यातून फक्त एकच गाडी जाईल आणि समोरून मोठा ट्रक येत होता. त्यात काहीजण मला माझी गाडी काढण्यासाठी सांगत होते. यावर मी त्यांना सांगितलं की माझी गाडी इथून जाणार नाही आणि मी माझी गाडी काढणार नाही. लोकांना बोलायला काय? आपल्याला माहीत आहे आपल्या गाडीची किंमत काय आहे. आपण इतक्या महागड्या गाड्या घेतो. जर गाडीला काही झालं त्र हे लोक भरून देणार आहेत का? त्यावर एकाने मला असं म्हटलं की गाडी चालवायला येत नाही तर का चालवता?”
आणखी वाचा – सई, प्रसाद, समीर, ईशा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार, ‘गुलकंद’मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जुगलबंदी होणार
यापुढे जान्हवीने असं म्हटलं की, “माझ्याऐवजी जर एखाद्या पुरुषाने हे सांगितलं असतं तर लोकांनी त्याचं ऐकलं असतं. पण तेच एका मुलीने सांगितलं आहे ना? मुलींना काही अक्कलच नसते. त्यांना गाडी चालवताच येत नाही असंच लोकांना वाटतं. समाजातील हा भेदभाव कधी कमी होणार आहे? कारण तुम्ही माझं बिग बॉस बघितलं असेल तर त्यातही मुलींनी हे करु नये, मुलं हे करु शकतात मुली हे करु शकत नाहीत हा भेदभाव का आहे? हाच प्रश्न मला पडला आहे. सगळेच समान आहेत आणि सगळेच सगळी कामे करु शकतात”.