Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला सुरुवात होऊन आता सात आठवडे पूर्ण व्हायला आले आहेत. यंदा या घरात एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी पुरुषोत्तमदादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना, आणि घन:श्याम दरवडे या स्पर्धकांनी आतापर्यंत या घराचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आता उर्वरीत सदस्यांमध्ये या घरात टिकून राहण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या लढतीसाठी ‘बिग बॉस’कडून अनेक टास्क स्पर्धकांना टास्क दिले जातात. दर आठवड्यात पहिल्या दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडतो. साधारणत: सोमवार-मंगळवारीच या आठवड्यात नेमकं कोणं नॉमिनेट होणार? हे प्रेक्षकांसमोर स्पष्ट होतं. (Bigg Boss Marathi 5 Today Elimination)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या आठवड्यात ‘जादुई दिवा’ हा नॉमिनेशन टास्क घेण्यात आला. स्पर्धकांना घरातील अन्य सदस्यांचे फोटो गळ्यात घालून संबंधित स्पर्धकाला नॉमिनेशनपासून वाचावायचं की नाही हा निर्णय घ्यायचा होता. हा नॉमिनेशन टास्क खेळताना ‘बिग बॉस’च्या घरात अनेक ट्विस्ट आले. सदस्यांना बझर वाजल्यावर जादुई दिव्याजवळ सर्वात आधी पोहोचणं गरजेचं होतं. या टास्कमध्ये निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर आणि आर्या जाधव हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यापैकी आर्याला या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे आज या घरातून कोण बाहेर जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा – मायरा वायकुळला झाला भाऊ, आईने चिमुकुल्याला जन्म देताच आनंद गगनात मावेना, फोटो व्हायरल
अशातच कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यातून या घरातील नॉमिनेटेड सदस्यांपैकी एका स्पर्धकाचा प्रवास संपणार असल्याचे दिसूण येत आहे. भाऊचा धक्कामध्ये रितेशने सांगितले होते की आर्या ही नॉमिनेटेड सदस्यांपैकीच एक होती. मात्र बिग बॉसचा निर्णय मोडल्यामुळे तिला या घरातून बाहेर जावे लागले. मात्र तरीही एलिमिनेशन हे होणारचं. आजचा भाऊचा धक्का खास असणार आहे, कारण रितेश स्वत: या घरात प्रवेश करणार आहे आणि एलिमिनेशनचा निर्णयही तो बिग बॉसच्या घरातूनच देणार आहे. त्यामुळे घरातून नक्की कोण बाहेर जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, टास्कमध्ये झालेल्या वादात आर्याने थेट निक्कीच्या कानशिलात लगावली. यानंतर निक्की मोठा हंगामा करताना दिसली होती. ‘मला न्याय हवा, बिग बॉस आर्याला बाहेर काढा’ असं निक्कीने म्हटलं होतं. त्यानंतर शनिवारच्या ‘भाऊचा धक्का’मध्ये आर्याला ‘बिग बॉस’ने घरातून तत्काळ बाहेर निघून जाण्याची शिक्षा दिली. अगदी कुणालाही निरोप देण्याची संधी न देताच आर्याला या घराच्या बाहेर काढण्यात आलं. यामुळे आता प्रेक्षक मंडळी प्रचंड संतापली आहेत.