बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “कारण तो संस्कारी मुलगा आहे”, ‘या’ कारणामुळे रितेश देशमुखनं केलं सूरज चव्हाणचं कौतुक, म्हणाला…

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 18, 2024 | 9:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update Riteish Deshmukh praised Suraj Chavan performance and his manners

Bigg Boss Marathi 5 मधील सूरज चव्हाणच्या संस्करांचं होतंय कौतुक, रितेश देशमुखही त्याच्या साधेपणाच्या प्रेमात

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा आठवडा गोलीगत सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला. याबद्दल ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश सूरजचं भरभरून कौतुक करताना दिसणार आहे. सूरज कॅप्टन झालेला नसला तरी या आठवड्यात त्याने विरुद्ध टीमसोबत दोन हात केले. पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसऱ्या आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला. प्रेक्षकांनाही त्याचा खेळ आवडला असून, शनिवारच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेशही त्याचं कौतुक करताना दिसेल.  (Bigg Boss Marathi 5 daily update)

भाऊच्या धक्क्यावर सूरजबद्दल रितेश म्हणतो की,”या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला. ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. अख्ख घर म्हणतं त्याला गेम कळत नाही. पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला. त्याने एकट्याने सगळ्यांना टफ फाईट दिली”. यावेळी रितेश सूरजचं कौतुक करत म्हणाला की, “झुंड में तो भेडियां आती हैं…” आणि त्याचं हेच वाक्य पूर्ण करत सूरज म्हणाला की, ” लेकीन शेर अकेला आता है!” तसंच रितेश पुढे म्हणाला की, “तीन आठवड्यात पहिल्यांदाच अरबाजच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. निक्की आणि जान्हवीदेखील घाबरलेल्या दिसून आल्या होत्या’.

तेव्हा निक्की रितेशचं वाक्य मध्येच टोकत असं म्हणाली की “आम्ही त्याला घाबरलो नव्हतो, तर ती एक आमची Strategy (रणनीती) होती. आम्ही सूरजचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणून मी अरबाज अरबाज म्हणूण् ओरडत होते. जेणेकडून सूरज आमच्या इथे येणार नाही आणि आम्हाला हेही माहीत होतं की तो आम्हाला हात लावणार नाही”.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – 18 August Horoscope : सिंह राशीसह ‘या’ ४ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल, रविवारचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल?, जाणून घ्या…

यावर रितेश निक्कीला “का?” असा प्रश्न विचारतात. तेव्हा निक्कीकडे उत्तर नसतं. पण याच प्रश्नावर रितेश असं म्हणतो की, “कारण तो एक संस्कारी मुलगा आहे”. त्याच्या याच वाक्यावर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा गडगडाट केला जातो. तसंच रितेश पुढे म्हणतो की, “कोणालाही कमी लेखू नये. हे या आठवड्यात सिद्ध झालं आहे. सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीही खेळू नका. सर्वांना समान न्याय मिळायला हवा. या घरातील सर्व सदस्य समान आहेत. सूरजने एकट्याने बाजी मारली आहे. त्याला कमी लेखू नका.” सूरजला बिनधास्त खेळण्याचा सल्ला रितेशने दिला.

आणखी वाचा – ‘सुंदरी’ मालिकेनंतर आरती बिराजदारची नवी भूमिका, ‘पाऊस’ वेबसीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, या टास्कनंतर सूरजने स्वत: निक्की व जान्हवी यांची किचनमध्ये जाऊन माफी मागितली होती. यावेळी निक्कीने त्याच्या वागण्यावर मी घाबरली असल्याचे म्हटलं होतं. तेव्हा सूरजनेही तिला असं म्हटलं होतं की, “मी कोणत्याही स्त्री जवळ जात नाही. टास्कसाठी मी केलं असेन. पण मी स्त्रियांपासून अंतर राखूनचं असतो” आणि त्याच्या याच कृतीचं सर्वत्र कौतुक झालं होतं. आशातच काल रितेशनेही त्याच्या संस्कारांचं पुन्हा एकदा कौतुक केलं.   

Tags: bigg boss marathi 5ritiesh deshmukhSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Actress Kranti Redkar shared a video of celebrating her birthday by donating food and gifts to the poor

Video : पार्टी किंवा सेलिब्रेशन न करता गोरगरिबांना अन्नदान व भेटवस्तू देत क्रांती रेडकरने साजरा केला तिचा वाढदिवस, संस्कारांचं होतंय कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.