शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कुटुंबावर गंभीर आरोप केल्यानंतर ‘बिग बॉस’ फेम स्पर्धकाचा भीषण अपघात; प्रकृतीबाबत पत्नीने दिली माहिती

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 10, 2026 | 9:32 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Anurag Dobhal Health Update

'बिग बॉस' फेम स्पर्धकाचा भीषण अपघात

Anurag Dobhal Health Update : ‘Bigg Boss 17’ मधून प्रसिद्धी मिळवलेला युट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर Anurag Dobhal सध्या चर्चेत आला आहे. नुकताच त्याचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेनंतर चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अनुराग इन्स्टाग्रामवर लाईव्ह होता. त्यावेळी तो मानसिकदृष्ट्या खूप तणावात असल्याचं आणि स्वतःला एकटं वाटत असल्याचं सांगताना दिसला. दरम्यान तो कार चालवत असताना अचानक त्याने कारचा वेग वाढवला. काही क्षणांतच कारचा वेग १५० किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.

वेग जास्त झाल्यामुळे कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्याची कार आदळली. या धडकेत त्याचा गंभीर अपघात झाला. अपघातानंतर अनुरागला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते त्याच्या प्रकृतीबाबत सतत चौकशी करताना दिसत आहेत. दरम्यान, अनुरागची पत्नी Ritika Chauhan हिने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिने सांगितलं की, “अनुराग सध्या सुरक्षित आहे. अपघातात त्याला काही दुखापती झाल्या असल्या तरी तो लवकरच बरा होईल, अशी माहिती तिने दिली”. (Anurag Dobhal Health Update )

तसेच सध्या त्यांच्या कुटुंबासाठी हा काळ कठीण असल्याचं सांगत कोणत्याही अफवा पसरवू नयेत, अशी विनंतीही तिने केली आहे. याशिवाय अनुरागच्या मॅनेजरनेही सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या प्रकृतीची माहिती दिली. सध्या अनुराग डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र रुग्णालयात उपस्थित आहेत, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर अनुरागच्या लवकर बरे होण्यासाठी चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत. (Anurag Dobhal Health Update )

Tags: Anurag Dobhal Health Updatebollywood newsentertainment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Kinshuk Vaidya Baby Boy News

लग्नाच्या दीड वर्षांनी मराठमोळा अभिनेता झाला बाबा, बाळाचा फोटो पोस्ट करत दिली गुडन्यूज, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.