Bigg Boss 18 Contestants List : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय व यशस्वी रिॲलिटी शोपैकी एक म्हणजे ‘बिग बॉस’. सध्या ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोने साऱ्यांच्या मनावर राज्य केलं आहे. तर आतापर्यंत ‘बिग बॉस’ हिंदीचेही १७ सीझन खूप हिट झाले. यानंतर ‘बिग बॉस’च्या १८व्या सीझनची जोरदार तयारी सुरु असल्याचं कानावर येत आहे. त्याच वेळी, ‘बिग बॉस १८’च्या अपेक्षित स्पर्धकांची यादी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस १८’साठी अनेक अभिनेत्रींची नावे समोर येत आहेत. तथापि, निर्मात्यांनी अद्याप कोणत्याही स्पर्धकाचे नाव उघड केलेले नाही.
‘बिग बॉस’ सीझन १८ चा भाग असणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावे सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ची बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता ‘बिग बॉस १८’ मध्ये ग्रँड एण्ट्री करणार असल्याची दाट शक्यता आहे. या शोसाठी अभिनेत्रीला विचारणा करण्यात आल्याचे बोलले जात आहे, मात्र अद्याप मुनमुन दत्ताकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. जर बबिता जी या रिॲलिटी शोमध्ये आली तर तिच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी असेल.
याशिवाय सोहेल खानबरोबर ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री समीरा रेड्डी बद्दलही बातमी समोर आली आहे. ती ‘बिग बॉस १८’चा भाग बनू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. समीरा बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीपासून दूर आहे, तरीही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. समीरा रेड्डीने ‘नो एंट्री’, ‘रेस’ व ‘दे दना दन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केली. ‘बिग बॉस १८’ मध्ये येण्यासाठी निर्मात्यांनी अभिनेत्रीशी संपर्क साधला आहे, आता समीरा सलमान खानच्या शोमध्ये येण्यास तयार होईल की नाही हे पाहणे बाकी आहे.
तसेच, वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेल्या दलजीत कौरबद्दलही असेही बोलले जात आहे की, ही अभिनेत्री या शोमध्ये दिसणार आहे. याशिवाय शोमध्ये पूजा शर्मा, दीपिका आर्या, नुसरत जहाँ, सोमी अली देखील दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. असेही म्हटले जात आहे की, टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेतलेली अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि सुरभी ज्योती यांना ‘बिग बॉस १८’ साठी विचारण्यात आले होते परंतु दोन्ही अभिनेत्रींनी शोमध्ये जाण्यास स्पष्टपणे नकार दिला. सलमान खानचा शो ‘बिग बॉस’ नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये दिसणाऱ्या स्पर्धकांमधील भांडणे व वाद खूप चर्चेत राहतात. रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस १८’ ५ ऑक्टोबरला प्रीमियर होणार आहे. अलीकडेच एका नवीन अपडेटमधून समोर आले आहे की ‘बिग बॉस १८’ ऑक्टोबरच्या पहिल्या शनिवारी लॉंच होणार आहे. मात्र, अद्याप अधिकृत तारखेबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.