गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अपशब्द न वापरता…”, अंकिता लोखंडेवर हात उचलण्यावरुन नवऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाला, “व्हायरल झालेला व्हिडीओ…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 3, 2024 | 1:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
vicky jain and ankita lokhande

"अपशब्द न वापरता...", अंकिता लोखंडेवर हात उचलण्यावरुन नवऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाला, "व्हायरल झालेला व्हिडीओ..."

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे व सुप्रसिद्ध उद्योगपती विकी जैन यांनी एकत्र प्रवेश केला होता. या शोमध्ये आल्यापासून विकी व अंकिता दोघेही चर्चेत राहिले. दोघांमधील भांडण, प्रेम, मारामारी यांच्यामुळे ही जोडी नेहमीच चर्चेत राहिली. या शोमध्ये विकीचा खेळ सर्वांनाच खूप आवडला होता. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक सदस्यासह त्याचे चांगले नाते निर्माण झाले होते. दरम्यान, या शोमध्ये विकी व अंकिता यांच्यात बराच वाद झाला होता. एकदा या शोमध्ये विकीने अंकितावर हात उचलण्याचाही प्रयत्न केला होता. ही व्हिडीओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती.

आता शो संपल्यानंतर विकी जैनने त्याच व्हायरल घटनेवर मौन सोडले आहे. विकीने त्या घटनेबद्दल उघडपणे भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे. अंकिताच्या पतीने विकीने नुकतीच ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत विकीने व्हायरल झालेल्या क्लिपबद्दल भाष्य केलं. त्याचा असा कोणताही हेतू नव्हता, क्लिपमध्ये ते चुकीचे दाखवण्यात आले असल्याचे त्याने म्हटलं आहे.

आणखी वाचा – अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे जिवंत, स्वतःच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, नेटकऱ्यांचा संताप अनावर

याबाबत बोलताना विकी म्हणाला, “जेव्हा मी ती क्लिप पाहतो तेव्हा ते कठोर हावभाव माझ्या डोळ्यासमोर दिसतात. पण सत्य हे आहे की, इतकं शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही अशा टप्प्यावर पोहोचता की तुम्ही खूप स्थिर व्यक्ती बनता. अशी प्रतिक्रिया देण्यासाठी या गोष्टी आपल्या व्यवस्थेत नाहीत. शोमध्ये माझे सर्वांशी भांडण झाले होते पण मी कोणाशीही बोलताना अपशब्द वापरले नव्हते. मी नेहमीच आचारसंहितेचे पालन केले आहे. मी नेहमी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवतो आणि मी हे सिद्धही केले आहे” असंही तो म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Vikas Jain (@realvikasjainn)

आणखी वाचा – Poonam Pandey Death : पूनम पांडेचा मृत्यू झालाच नाही, राहुल वैद्यचा मोठा दावा, नक्की खरं काय?

त्या क्लिपबद्दल बोलताना विकी पुढे म्हणाला की, “मी चुकीचा असेन अशी मुळात ही परिस्थिती नव्हती. या हावभावाला काही अर्थ नव्हता. हे मला व अंकिताला माहीत आहे. आमचं नातं खूप घट्ट आहे. आम्हाला माहित आहे की, आम्ही कोणत्या परिस्थितीत होतो. त्यामुळे हा व्हायरल झालेला व्हिडीओ पुन्हा पाहण्याची वा एकमेकांना स्पष्टीकरण देण्याची आम्हाला गरज नाही. विकी पुढे म्हणाला की, “आमचे नाते इतके घट्ट आहे की आम्ही एकमेकांना एका विशिष्ट पद्धतीने काम करु देतो. शिवाय एकमेकांना वैयक्तिक आयुष्य जगण्यासही परवानगी दिली आहे” असंही तो म्हणाला.

Tags: ankita lokhandeankita lokhande and vicky jainankita lokhande and vicky jain fightbigg boss 17entertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Next Post
Poonam Pandey Death

पूनम पांडे जिवंत असल्याचा राहुल वैद्यने केलेला दावा, निधन झालं नसल्याचं कळताच गायकाचा संताप, म्हणाला, "कलियुगात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.