‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचे विजेतेपद पटकावल्यानंतर प्रसिद्धी झोतात आलेला स्टँडअप् कॉमेडीयन म्हणजे मुनव्वर फारुकी. मुनव्वरबाबत नुकतीच एक बातमी समोर येत असून त्याची प्रकृती खालावली आहे. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. २४ मे रोजी मुनव्वरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या एका मित्राने मुनव्वरच्या चाहत्यांना ही बातमी दिली. मुनव्वरचा खास मित्र नितिन मेंघानीने चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे मुनव्वरच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
नितीन मेंघानीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर अकाऊंटद्वारे मुनव्वरचा हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला असून या फोटोद्वारे त्याने “माझा भाऊ लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी खूप शुभेच्छा” असं म्हटलं आहे. सध्या मुनव्वरचा हॉस्पिटलमधील हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे.

याआधीदेखील मुनव्वरची प्रकृती खालावली होती. गेल्या महिन्यात मुनव्वरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या महिन्यातही त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्याने स्वत:चा आयव्ही ड्रिप घेतल्याचा फोटोही शेअर केला होता. यावेळी त्यांनी ‘लग गई नजर’ असे लिहून वारंवार होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबद्दल चिंता व्यक्त केली.
आणखी वाचा – सायली-अर्जुनच्या हाती लागले महिपतविरुद्धचे पुरावे, आता साक्षीचा पर्दाफाश होणार का?, ‘ठरलं तर मग’ला रंजक वळण
अशातच आता त्याला नेमकं काय झालं आहे?, याबद्दल काही कालू शकले नसले तरी त्याचे अनेक चाहते मंडळी त्याच्या बरे होण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे आता तो लवकरच बरं होण्याची वाट पाहत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी मुनव्वरने पुणे अपघाताप्रकरणी संताप व्यक्त केला होता. एक्सवर मुनव्वरने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये मुनव्वरने असं म्हटलं आहे की, “तो पोर्श कार खरेदी करू शकतो तर, बाकी गोष्टीदेखील विकत घेऊ शकतो. मी १७ वर्षांचा होतो तेव्हा माझ्याकडे फक्त नोकिया 1100 फोन होता. ज्याला २ रबर लावलेले होते.”